एनबीए मधील हे आहेच पाच सर्वात वयस्कर खेळाडू 

बास्केटबॉल असा खेळ आहे ज्या खेळात तुम्हाला एकाच उर्जेने संपूर्ण ४० मिनिटांचा सामना खेळावा लागतो. प्रत्येकी १० मिनिटाच्या चारही क्वार्टरमध्ये तुम्हाला सातत्याने चांगला खेळ करावा लागतो. काही खेळण्याच्या शैलीवर अवलंबून आहे तसेच खेळाडूच्या फिटनेसवरही अवलंबून आहे. एनबीएमध्ये अजूनही ३५ ते ४० वयाचे खेळाडू बास्केटबॉल खेळतात. तर आपण आज पाहू पुढील पाच खेळाडू जे वयस्कर झाले असूनही उत्तम रीतीने आपला खेळ खेळतात.

हे पाच सर्वात वयस्कर खेळाडू:

# डेमियन विल्किंस

एनबीएच्या गोल्डन स्टेट वॉरियर्स या संघामध्ये खेळतो. त्याचा जन्म २९ ऑगस्ट १९८० साली झाला असून तो सध्या ३७ वर्षाचा आहे. त्याने २००३ पासून एनबीएत खेळायला सुरुवात केली. सुरुवातीला तो एनबीएच्या  न्यू ऑरलियन्स पेलिकन संघात खेळत होता. त्याने आतपर्यंत १३ एनबीएचे मौसम खेळलेले असून त्यापैकी आठ मौसमात प्ले ऑफ मध्ये सामील झालेला आहे तर १ वेळा एनबीए चॅम्पियनशिप जिंकलेली आहे. त्याचे सध्याचे मानधन ८,५४,३८९ मिलियन इतके आहे.

# डिर्क नोविज़्की

एनबीएच्या डलास मेवेरिक्स या संघामध्ये खेळत आहे. त्याचा जन्म १९ जून १९७८ साली झाला असून तो आता ३९ वर्षाचा आहे. त्याने  १९९८ एनबीएमधून बास्केटबॉल खेळत असून त्याने आतापर्यंत १८ मोसम  खेळलेले आहेत. २००७मध्ये  स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून पुरस्कार मिळाला होता.एनबीएच्या इतिहासात फक्त ६ खेळाडू आहे ज्यांच्या नावावर ३०,००० गुण आहेत. त्यामध्ये डिर्क नोविज़्कीचा क्रमांक लागतो. त्याचे सध्याचे मानधन २५.९ मिलियन इतके आहे.

# जेसन टेरी

हा एनबीएच्या मिलवॉकी बक्स या संघामध्ये खेळत असून त्याचा जन्म १५ सप्टेंबर १९७७ साली झाला असून तो सध्या ४० वर्षाचा आहे. त्याने १९९९ पासून एनबीएमध्ये खेळण्यास सुरुवात केली. तो तिसरा खेळाडू आहे ज्याने सर्वात ज्यास्त थ्री पॉईंटर टाकले आहेत. संघामधला तो सर्वात चांगला खेळाडू मानला जातो. त्याचे सध्याचे मानधन १.५५२ इतके आहे

# मनु गिनोबिली

एनबीएच्या सैन एन्टोनिओ स्पर्स या संघात खेळत असून त्याचा जन्म २८ जुलै १९७८ साली झाला असून तो आता ४० वर्षाचा आहे. त्याने १९९९ पासून तो एनबीएमध्ये खेळण्यास सुरुवात केली असून एनबीएतील सहा खेळाडूंमध्ये त्याला मानले जाते.  सैन एन्टोनिओ स्पर्स या संघाने एनबीएची चॅम्पिअनशिप मिळवली असून तो ऑलम्पिक संघामध्ये ही खेळला आहे. त्याचे सध्याचे मानधन २.५ मिलियन इतके आहे.

# विंस कार्टर

एनबीएच्या सैक्रामेंटो किंग्स या संघात खेळत असून त्याचा जन्म २६ जानेवारी १९७७ साली झाला असून तो आता ४० वर्षाचा आहे. त्याने १९९८ पासून एनबीएमध्ये खेळण्यास सुरुवात केली आहे. त्याला २०१७ चा एनबीएचा प्लेअर व्हॉइस अवॉर्ड मिळाला आहे तसेच अनेक पारितोषिके त्याच्या नावावर आहेत. त्याचे सध्याचे मानधन ४.२६४ मिलियन इतकी आहे.