इंडो शॉटले पीपीएल क्रिकेट २०१८ स्पर्धेस २५ नोव्हेंबरपासून प्रारंभ

पुणे | कारा इंटलेक्ट यांच्या व्यवस्थापन आणि संकल्पनेतून व पीवायसी हिंदू जिमखाना क्लब यांच्या संलग्नतेने सहावी इंडो शॉटले पीपीएल क्रिकेट 2018 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि.25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2018 या कालावधीत पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदानावर होणार आहे.

पत्रकारपरिषदेत अधिक माहिती देताना पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष डॉ.सुधीर भाटे आणि क्लबचे सचिव आनंद परांजपे, क्लबच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड यांनी सांगितले की, स्पर्धेचे सलग हे सहावे यशस्वी वर्ष असून सर्व सामने विद्युताप्रकाश झोतात होणार आहे.  या स्पर्धेत 15 संघ सहभागी झाले असून घेण्यात आलेल्या लिलावात कर्ना मेहता(5000रूपये) आणि  हर्षल गंद्रे(5000रूपये) हे सर्वाधिक महागडे खेळाडू ठरले. याशिवाय रवी कासट(4800रूपये), रोहन छाजेड(4700रुपये), अभिषेक ताम्हाणे(4700रुपये) या खेळाडूंना चांगले मुल्य मिळाले आहे.

विविध क्रिडाप्रकारांना वेळोवेळी प्रोत्साहन देण्यासाठी पीवायसी क्लब नेहमीच आघाडीवर असतो. स्पर्धेला इंडो शॉटलेचे विजय पुसाळकर यांचे प्रायोजकत्व लाभले असून होडेक व्हायब्रेशन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड व ब्रिहंस ग्रीनलीफ यांचे सहप्रायोजकत्व मिळाले आहे.

ते पुढे म्हणाले की, स्पर्धेत प्रत्येक संघात एकुण 9 खेळाडूंचा समावेश असणार आहे. स्पर्धेचे सामने हे 6 षटकांचे होणार आहेत. स्पर्धेसाठी क्रिकेट टेनिस बॉलचे सर्व नियम लागू असून सर्व सामने सायंकाळी 4.30 ते रात्री 10.30 या वेळेत होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना दि.1 डिसेंबर 2018 या दिवशी होणार आहे.

स्पर्धेत   अंजेनेयज्‌ ब्रेव्ह बेअर्स, आर्यन स्कायलार्क्स, गोखले सिनर्जी कोब्राज, गोल्डफिल्ड डॉल्फीन्स्‌,गुडलक हॉग्स लिमये, ट्रूस्पेस जॅगवॉर्स, सुपर लायन्स्‌,  जीएससी पँथर्स्‌, रेड बुल्स्‌, स्वोजस टायगर्स्‌, ओव्हन फ्रेश टस्कर्स्‌, एनएच वुल्वस्‌, डी-एच लिंक चिताज्‌, आर स्टॅलियन्स्‌, कासट ड्रॅगन्स  हे 15 संघ झुंजणार असल्याचे त्यांनी सांगितले.

स्पर्धेतील संघांची 3 गटात विभागणी करण्यात आली असून यामध्ये प्रत्येक 5 आणि 6 संघांचा समावेश असणार आहे. तसेच, या तीनही गटांतील अव्वल संघ उपांत्यपुर्व फेरीसाठी पात्र ठरणार असून आणखी दोन संघ गुणसरासरी आणि नेटरनरेटच्या आधारावर पात्र ठरणार आहेत.

प्रत्यक्ष मैदानावर खेळण्याचा व क्रिकेटवरचे प्रेम व्यक्त करण्याचा अनुभव या माध्यमांतून सभासदांना मिळणार आहे. या उपक‘माचे स्वरूप जरी स्पर्धात्मक असले, तरी पण प्रत्यक्षात सभासदांना या खेळाची मजा लुटता येणार आहे. विजेत्या संघाला ज्ञानेश्वर आगाशे स्मृती करंडक देण्यात येणार असून याशिवाय वैयक्तिक पारितोषिकेहि दिली जाणार आहे.

स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष डॉ.सुधीर भाटे आणि क्लबचे सचिव आनंद परांजपे, क्लबच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड , इंडो शॉटलेचे संचालक अनिल जलीहाल, ब्रिहांसचे सीएमडी अशुतोष अगाशे, रणजीत पांडे, इंद्रजीत कामटेकर, निरंजन गोडबोले, , शिरिष गांधी,  तुषार नगरकर, सारंग लागु, अभिषेक ताम्हाणे, देवेंद्र चितळे, निखिल शहा, अंजनेय साठे व कपिल खरे यांचा समावेश आहे.