एशियन गेम्समध्ये भारतीय चमूचा ध्वजधारक २० वर्षीय भालाफेकपटू नीरज चोप्रा

इंडोनेशियातील जकार्तामध्ये सुरू होणाऱ्या एशियन गेम्समध्ये भारतीय चमूचा ध्वजधारक भालाफेकपटू नीरज चोप्राची निवड करण्यात आली आहे. या १८व्या एशियन गेम्सना १८ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे.

२० वर्षीय चोप्राने यावर्षीच्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला. भालाफेकमधील ८७.४३ मीटर राष्ट्रीय विक्रम त्याच्याच नावावर असून त्याने हा पराक्रम मे महिन्यात दोहामध्ये झालेल्या डायमंड लीगमध्ये केला होता.

तसेच फिनलॅंड येथे नुकतेच झालेल्या आईएएएफ 20 वर्षाखालील जागतिक एथलॅटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत त्याने सुवर्ण पदक मिळवले.

२०१७च्या एशियन अॅथलेटिक चॅम्पियनशीपमध्ये ८५.२३ मीटरवर भाला फेकून सुवर्ण पदक जिंकले होते. तसेच २०१६मध्ये पोलंड येथे झालेल्या २० वर्षांखालील आयएएएफ चॅम्पियनशिप स्पर्धेतही त्याने सुवर्ण पदक पटकावले आहे.

ध्वजधारक म्हणून निवड झाल्यावर चोप्राने भारतीय अॉलम्पिक संघटनेचे आभार मानले.

२०१४ला झालेल्या दक्षिण कोरीयातील १७व्या एशियन गेम्समध्ये भारतीय अॅथलेटिक्सने एकूण ५७ पदके पटकावली होती. यात ११ सुवर्ण, १० रौप्य आणि ३६ कांस्य पदकांचा समावेश आहे. त्यावेळी हॉकीचा कर्णधार सरदार सिंग हा ध्वजधारक होता.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या-

जेम्स अॅंडरसनकडून कुंबळेच्या जंबो विक्रमाची बरोबरी

विश्वचषकाच्या फायनलची खेळपट्टी बनवणाऱ्या ग्राउंड्समनचा निरोप सभारंभ हुकला