पाकिस्तानी क्रिकेटपटू होणार मालामाल, नवीन करारानुसार किती रुपये मिळणार पहाच

पाकिस्तान क्रिकेट मंडळाने येत्या तीन वर्षाच्या कालावधीसाठी करारबद्ध होणाऱ्या खेळाडूंच्या मानधनात 25 ते 30 टक्क्यांनी वाढ होणार आहे.

त्याचबरोबर खेळाडूंच्या प्रत्येक सामन्याच्या मानधनातही 20 टक्के वाढ करण्यात येणार आहे.

पाकिस्तान क्रिकेट मंडळाने मानधनात केलेली ही वाढ ए, बी, सी आणि डी या श्रेणीतील खेळाडूंसाठी लागू होणार आहे.

त्याचबरोबर पाकिस्तान क्रिकेट मंडळने या चार श्रेणीमध्ये इ श्रेणीचाही समावेश केला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा यामध्ये समावेश करण्यात येणार आहे.

पाकिस्तान क्रिकेट मंडळाने येत्या तीन वर्षासाठी 33 खेळाडूंना करारबद्ध केला आहे.

गेल्या वर्षी बी श्रेणीमध्ये असलेल्या बाबर आझमला यावेळी ए श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. तर पाकिस्तान संघाचा वरिष्ठ खेळाडू मोहम्मद हफीजची ए श्रेणीतून बी श्रेणीत घसरण झाली आहे.

अजहर अली, शोएब मलिक, सरफराज अहमद, यासिर शाह आणि मोहम्मद आमिर यांचे ए श्रेणीतील स्थान कायम आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

-२० वर्षीय फलंदाजाचा अविश्वसनीय प्रवास, लॉर्ड्स कसोटी सामन्यात करणार पदार्पण!

-सामना संपल्यावर धोनीने पंचांकडे चेंडू मागितला आणि चर्चा सुरु झाली….