आयसीसीच्या नवीन नियमांमुळे क्रिकेट अधिक रोमांचक होईल: विराट कोहली

मुंबई । भारताचा कर्णधार विराट कोहली शनिवारी म्हणाला की आयसीसीच्या नवीन नियमांमुळे क्रिकेट अजूनही रोमांचक होईल. नवीन नियमांच्या अंतर्गत भारत आपली पहिली वनडे मालिका आजपासून न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. ही मालिका तीन सामन्यांची असणार आहे.

“काही नियम खूपच वेगळे आहेत. फलंदाज स्क्रीजमध्ये असताना जर फलंदाज बॅट हवेत असेल तर त्या फलंदाजाला धावचीत बाद देण्यात येत नाही. त्याचबरोबर डिसिजन रिव्हय़ू सिस्टीममध्ये अंपायर्स कॉलमध्ये झालेला बदल क्षेत्ररक्षणात एक नियम बदलला आहे”, असे कोहली सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

“बाकी संघ सहकाऱयांना नियमांबद्दल अजून माहिती देणे गरजेचे आहे सुरुवातीला प्रत्येक नियम पाळणे अवघड जाणार आहे पण हळूहळू आम्हाला त्याची सवय होईल. पण नवीन नियमांमुळे खेळ अजूनही रोमांचक होणार आहे. जेव्हा तुम्ही सामना खेळण्यासाठी मैदानात आला तेव्हा तुमच्या डोक्यात बऱ्याच गोष्टी असणार आहेत आणि यामुळेच खेळावर लक्ष केंद्रित होण्यासाठी खूप मदत होईल.”

भारताचा कर्णधार विराट कोहली आपल्या वनडे कारकिर्दीतील २०० वा वनडे सामना आज खेळणार आहे. आयसीसी क्रमवारीत झालेल्या फेरबदलाबद्दल विचारले असता तो म्हणाला, “आम्ही आयसीसी क्रमवारीबद्दल जास्त विचार करत नाही.

“दक्षिण आफ्रिका आणि आम्ही आता समान गुणांवर आहोत. आमचा आत्तापर्यंत विश्रांती चालू होता, तर दक्षिण आफ्रिका सामने खेळत होती त्यामुळे आम्ही घरी बसून असा विचार करत बसलो नाही की आमचा पहिला क्रमांक गेला. या गोष्टी होत राहतात आणि आयसीसी क्रमवारीत बदल घडत राहतात.”

“मी माझ्या संघातील फलंदाजांनाही हे सांगत असतो की आयसीसी क्रमवारीत काही फलंदाजवर जातात तर काही जात नाही पण त्याच्या फलंदाजीवर काहीही फरक पडता कामा नये. शेवटी तुमच्या कामगिरीमुळे तुमचा संघ जिंकू शकतो का? हे महत्त्वाचे आहे.”

आता भारत आयसीसी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत तर पहिल्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका आहे. जर भारताला आपले अव्वल स्थान पुन्हा मिळवायचे असेल तर या मालिकेत भारताला न्यूझीलंडला व्हाईट वॉश देणे गरजेचे आहे.