ला लीगामध्ये मेस्सीने केला एक खास विक्रम…

ला लीगामध्ये रविवारी (2 सप्टेंबर) झालेल्या हुएस्का विरुध्दच्या सामन्यात बार्सिलोनाचा स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सीने दोन गोल करत 37 वेगवेगळ्या क्लबविरुद्ध गोल करण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. हा सामना बार्सिलोनाने 8-2 असा जिंकला.

तर रियल माद्रीदच्या रॉल गोंझालेजने 35 वेगवेगळ्या क्लबविरुद्ध गोल केले आहेत.

मेस्सीने 2005ला पहिला गोल अल्बासेटे विरुद्ध केला होता. हा गोल रोनाल्डीन्होने असिस्ट केला होता.

तसेच मेस्सीने यातील 11 क्लबविरुद्ध खेळताना त्याच्या प्रत्येकी पहिल्या सामन्यात गोल केले आहेत (रायो, बेटीस, अॅथलेटिक, आयबर, रेसिंग, अल्मेरिया, मॅलोर्का, स्पोर्टींग, टेनेरिफे, अलॅबेस, कोरडोबा, लिगानीज, रिक्रिएटिव्हो, नॅस्टीक, हुएस्का ).

तर त्याच्या दुसऱ्या सामन्यात मेस्सीने सेविला, अॅटेटिको, डेपोर्टीव्हो, रियल सोसिडॅड, ग्रेनेडा, सेल्टा, एल्चे, हरक्युलस, न्युमासिया, अल्बासेटे, गिरोना यांच्या विरुध्द गोल केले आहेत.

तसेच हुएस्का विरुद्धच्या सामन्यात मेस्सीने त्याचा 250वा असिस्टही केला आहे. सलग 46 सामने तो न हरता खेळला आहे. तर आंद्रेस इनिएस्ता सलग 55 सामन्यात अपराजित राहिला आहे. तसेच सात वेळा मेस्सीने एकाच सामन्यात दोन गोल आणि असिस्ट केले आहेत.

ला लीगामध्ये मेस्सीने एकूण 150 असिस्ट केले असून मागील 40 वर्षातील असा करणारा तो पहिलाच फुटबॉलपटू ठरला आहे.

बार्सिलोनासाठी मेस्सीने 641 सामने खेळले असून त्याने डॅनी अल्वेसचा विक्रम मोडला. तसेच त्याने 523 गोलही केले आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

युएस ओपन: दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररला पराभवाचा धक्का

अॅलिस्टर कूकच्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी असा आहे इंग्लंडचा संघ

टीम इंडियाच्या पराभवानंतर काही मिनिटातच केलेल्या ट्विटमुळे केएल राहुल झाला ट्रोल