पुणेरी पलटन पाठोपाठ यू मुम्बाचाही प्रो कबड्डीत खास विक्रम

पुणे। प्रो कबड्डीच्या सहाव्या मोसमात आज(24 नोव्हेंबर) यू मुम्बा विरुद्ध दबंग दिल्ली संघात सामना सुरु आहे. हा सामना यू मुम्बासाठी ऐतिहासिक सामना आहे. कारण हा त्यांचा प्रो कबड्डीमधील 100 वा सामना आहे.

प्रो कबड्डीमध्ये 100 सामने खेळणारा यू मुम्बा केवळ तिसरा संघ ठरला आहे. याआधी हा विक्रम पटना पायरेट्स आणि पुणेरी पलटनने केला आहे.

प्रो कबड्डीमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम पटना पायरेट्सच्या नावावर असून त्यांनी 103 सामने खेळले आहेत. त्यांच्या पाठोपाठ पुणेरी पलटन आहे. पुणेरी पलटनने प्रो कबड्डीत 100 सामने खेळले आहेत.

त्यामुळे यू मुम्बा या यादीत पुणेरी पलटनसह संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. पुणेरी पलटनने काल (23 नोव्हेंबर) जयपूर पिंक पँथर्सविरुद्ध त्यांचा प्रो कबड्डीतील 100 वा सामना खेळला आहे.

प्रो कबड्डीमध्ये सर्वाधिक सामने खेळणारे संघ-

103 सामने – पटना पायरेट्स

100 सामने – पुणेरी पलटन

100 सामने – यू मुम्बा

94 सामने – जयपुर पिंक पँथर्स

94 सामने – बेंगाल वॉरियर्स

महत्त्वाच्या बातम्या:

प्रो कबड्डीमध्ये अशी कामगिरी करणारा दीपक हुडा केवळ चौथा कबड्डीपटू

पवनकुमार शेरावतला आज प्रो कबड्डीत मोठा विक्रम करण्याची संधी

बंगळूरु बुल्सचा कर्णधार रोहित कुमारचा प्रो कबड्डीमध्ये मोठा पराक्रम