भारत दौऱ्यासाठी न्यूजीलँड संघाची घोषणा

२२ ऑक्टोबर पासून न्यूजीलँड संघाचा भारत दौरा सुरु होणार आहे. या दौऱ्यात ३ वनडे तर ३ टी २० सामने होणार आहेत. या दौऱ्यासाठी न्यूजीलँड क्रिकेट बोर्डाने ९ खेळाडूंची घोषणा आधीच केली होती. त्यानंतर आज त्यांनी संपूर्ण दौर्यासाठीच्या संघाची घोषणा केली.

न्यूझीलंड संघात टॉड अश्स्टेल आणि ग्लेन फिलिप्स पदार्पण करणार आहेत तर त्यांच्या बरोबरच मॅट हेन्री, हेन्री निकोल्स, कॉलिन मुनरो, आणि जॉर्ज वर्कर यांनाही संघात स्थान देण्यात आले आहे. हे सहाही जण न्यूझीलंड अ संघात या वर्षी खेळले होते.

न्यूझीलंड क्रिकेट निवड समितीचे अध्यक्ष गॅविन लार्सन हे अश्स्टेल आणि फिलिप्स यांच्या निवडीबद्दल म्हणाले की “अश्स्टेल हा मागच्या काही मोसमात घरेलू क्रिकेटच्या मर्यादित क्रिकेटमध्ये चांगला खेळला आहे. त्याने न्यूझीलंड अ संघात चांगला खेळ केला. त्याच्यामुळे संघात अष्टपैलू खेळाडू आला आहे. तो चांगला लेग स्पिन करतो तसेच तो क्षेत्ररक्षणातही चपळ आहे. त्याचबरोबर तो फलंदाजीतही योगदान देऊ शकतो.”

“फिलिप्सनेही घरेलू क्रिकेटमध्ये चांगला परिणाम साधला आहे आहे. त्याने न्यूझीलंड अ संघात चांगली संधी मिळवून नाबाद १४० धावा केल्या. तो यष्टिरक्षणसाठी वनडे आणि टी २० साठी एक पर्याय असेल. त्यामुळे आम्ही त्याची १५ जणांच्या संघात निवड केली.”

त्याचबरोबर वनडे मालिकेनंतर दोन बदल करण्यात येतील. ईश सोधी आणि टॉम ब्रूस हे टी २० मालिकेत रॉस टेलर आणि जॉर्ज वर्कर यांच्या जागेवर खेळतील.

वनडे संघ:
केन विलिअमसन(कर्णधार),टॉड अश्स्टेल, ग्लेन फिलिप्स,ट्रेंट बोल्ट,कॉलिन द ग्रॅंडहोम,मार्टिन गुप्टिल, मॅट हेन्री, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स,ऍडम मिल्ने,कॉलिन मुनरो,ग्लेन फिलिप्स, मिचेल सॅन्टनेर, टीम साऊथी,रॉस टेलर,जॉर्ज वर्कर

टी २० संघ:
केन विलिअमसन(कर्णधार),टॉड अश्स्टेल, ग्लेन फिलिप्स,ट्रेंट बोल्ट,कॉलिन द ग्रॅंडहोम,मार्टिन गुप्टिल, मॅट हेन्री, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स,ऍडम मिल्ने,कॉलिन मुनरो,ग्लेन फिलिप्स, मिचेल सॅन्टनेर, टीम साऊथी,ईश सोधी आणि टॉम ब्रूस