भारताला पराभूत करत न्यूझीलंडने सलग दुसऱ्यांदा केला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश

मँचेस्टर। 2019 क्रिकेट विश्वचषकात भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील पहिला उपांत्य सामना आज राखीव दिवशी पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने 18 धावांनी विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर विजयासाठी 50 षटकात 240 धावांचे आव्हान ठेवले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला 49.3 षटकात सर्वबाद 221 धावा केल्या.

भारताकडून एमएस धोनी आणि रविंद्र जडेजाने अर्धशतकी खेळी करत चांगली झुंज दिली होती. या दोघांनी 7 व्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी केली. धोनीने 72 चेंडूत 50 धावांची खेळी केली. तर जडेजाने 59 चेंडूत 77 धावांची खेळी केली.

मात्र भारताच्या अन्य फलंदाजांनी खास काही केले नाही. भारताने रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली या भारताच्या पहिल्या तीन फलंदाजांच्या विकेट्स चार षटकांच्या आत 5 धावांवर असतानाच गमावल्या होत्या.

तसेच भारताने पहिल्या तीन विकेट्स गमावल्यानंतर कार्तिकनेही 6 धावांवर विकेट गमावली. तर खेळपट्टीवर स्थिर झाल्यानंतर रिषभ पंतने आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी 32 धावा करत विकेट गमावल्या.

न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने सर्वाधिक 3, तसेच ट्रेंट बोल्ट आणि मिशेल सँटेनरने प्रत्येकी 2 तर लॉकी फर्ग्यूसन आणि जेम्स निशामने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पूर्वी न्यूझीलंडने 50 षटकात  8 बाद 239 धावा केल्या होत्या. त्यांच्यकडून कर्णधार केन विलियम्सनने 67 आणि रॉस टेलरने 77 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर भारताकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

…म्हणून सौरव गांगुलीने तो खेळाडू मैदानावर आल्यावर व्यक्त केले आश्चर्य

वनडे क्रिकेटच्या इतिहासात अशी गोष्ट पहिल्यांदाच घडली

रविंद्र जडेजाने जबरदस्त थ्रो करत केले रॉस टेलरला धावबाद, पहा व्हिडिओ