सगळ्यांनी माघार घेतली असताना हा देश करणार पाकिस्तानचा दौरा?

न्युझीलंड क्रिकेटने पाकिस्तानमध्ये खेळण्याच्या मागणीचा विचार करण्यास सकारात्मकता दर्शवली आहे. 2009 मध्ये श्रीलंका संघाच्या बसवर झालेल्या आतंकवादी हल्ल्यामुळे पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने नियमीतपणे झाले नाही.

 या हल्ल्यानंतर श्रीलंकेचा संघ ऑक्टोबरमध्ये आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळण्यासाठी लाहोरमध्ये आला होता. तसेच मागच्या महिन्यात वेस्ट इंडिजचा संघ 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी कराचीत आला होता.
झिम्बाब्वेचा संघ पण पाकिस्तानमध्ये 2015 ला 3 एकदिवसीय आणि 2 टी-20 सामने खेळला आहे.

न्युझीलंडचा संघ ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानचा दौरा करणार आहे. यामध्ये 3 कसोटी, 5 एकदिवसीय आणि 1 टी-20 सामने होणार आहेत. परंतु हे सामने नक्की कुठे होणार याबद्दल काही निश्चित नाही. वेळ आलीच तर हे सर्व सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये होतील. 

सध्या पीसीबी घरच्या मैदानावर छोट्या स्वरूपाचे सामने खेळवण्याचा विचार करत आहे.

“न्युझीलंड क्रिकेटने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( पीसीबी) अध्यक्षांची  पाकिस्तानमध्ये खेळण्याची मागणी स्विकारली आहे,” असे रिचर्ड बूक म्हणाले.

जेव्हा पीसीबीने न्युझीलंड क्रिकेटला पाकिस्तानमध्ये खेळण्याची मागणी केली होती तेव्हा ते या मागणीवर काम करताना सुरक्षा पुरवणारे, सरकार आणि खेळांडूसोबत विचारविनीमय करत आहेत.

” या सगळ्या चर्चेनंतर आम्ही पीसीबीला आमचा निर्णय सांगू,” असे न्युझीलंड क्रिकेट सांगितले.

याआधी न्युझीलंड 2003ला पाकिस्तानमध्ये एकदिवसीय मालिका खेळली होती. त्या कसोटी मालिकेच्या एका वर्षानंतर कराचीमधील संघाच्या हॉटेलबाहेर झालेल्या बॉम्ब ब्लास्टमुळे न्युझीलंड संघाने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला होता.

महत्त्वाच्या बातम्या –

लॉर्ड्सवर होणाऱ्या ऐतिहासिक सामन्यासाठी पंड्या, कार्तिकसह ९ खेळाडूंची नावे जाहीर

धोनी, तु माझा देव आहेस!

रोहित-गंभीरकडे आयपीएल ट्राॅफी तर विराटकडे काॅफीचा कप

आता गुरू जस्टिन लॅंगर दाखवणार आॅस्ट्रेलियाला मार्ग, प्रशिक्षकपदी नियुक्त

दिल्ली डेअरडेविल्सच्या तीन पोरांनी राजस्थान राॅयल्सला रडवले