फक्त या देशाचे क्रिकेटर खेळणार संपुर्ण आयपीएल २०१९

मुंबई | न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड २०१९ आयपीएलवेळी आपल्या खेळाडूंना मध्येच बोलवणार नाही. त्याचे खेळाडू हे संपुर्ण हंगामासाठी उपलब्ध असणार आहेत.

इंग्लंड आणि आॅस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने यापुर्वीच त्यांचे खेळाडू आयपीएल मध्येच सोडून मायदेशी परतण्याचे संकेत दिले आहेत.

आयपीएलचा हा हंगाम न्यूझीलंडच्या खेळाडूंसाठी २०१९च्या विश्वचषकासाठी चांगला सराव ठरणार आहे. त्यामुळे सर्व खेळाडू या हंगामासाठी उपलब्ध असतील असे न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने सोमवारी घोषीत केले.

आयपीएलचे वेळापत्रक अजून घोषीत झाले नसले तरी नेहमीपेक्षा यावेळी ही स्पर्धा लवकर सुरु होऊन लवकर संपण्याचे भाकित अनेक क्रिकेट तज्ञांनी वर्तविले आहे.