…म्हणून आयसीसीने न्यूझीलंड संघाला सुनावली ही शिक्षा

2019 विश्वचषकात शनिवारी (22 जून) 29 वा सामना न्यूझीलंड विरुद्ध विंडीज संघात ट्रेंट ब्रिज मैदानावर पार पडला. शेवटच्या क्षणापर्यंत रोमांचकारी ठरलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने 5 धावांनी विजय मिळवला.

पण न्यूझीलंडने हा विजय मिळवला असला तरी त्यांना या सामन्यात षटकांची गती कमी राखल्याने आयसीसीने दंड केला आहे. या सामन्यात न्यूझीलंडकडून निर्धारित वेळेत असलेल्या षटकांच्या टार्गेटपेक्षा एक षटक कमी पडले. त्यामुळे सामनाधिकारी डेव्हिड बून यांनी न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन आणि त्याच्या संघसहकाऱ्यांना दंड केला आहे.

हा दंड खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी असलेल्या आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम 2.22 नुसार करण्यात आसा आहे. हे कलम षटकांची गती कमी राखल्याबद्दल आहे. यानुसार विलियम्सनला मॅच फीच्या 20 टक्के दंड झाला आहे. तर न्यूझीलंडच्या अन्य खेळाडूंना 10 टक्के दंड करण्यात आला आहे.

न्यूझीलंड संघाने ही चूक मान्य केली असून शिक्षा देखील मान्य केली आहे. त्यामुळे यावर कोणतीही अधिकृत सुनावणी होणार नाही.

तसेच न्यूझीलंडने जर या स्पर्धेत परत षटकांची गती कमी राखण्याची चूक केली तर ती त्यांची दुसरी चूक समजली जाईल. त्यामुळे विलियम्सनला एका सामन्याच्या बंदीलाही सामोरे जावे लागू शकते.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विंडिज विरुद्ध विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह खेळणार नाही, हे आहे कारण

‘हम तो डूबे हैं सनम, तुमको भी ले डूबेंगे’: अफगाणिस्तानच्या कर्णधाराचे बांगलादेशला आव्हान

हॅट्रिक बॉलच्या आधी धोनीने दिला होता हा सल्ला, शमीने केला खुलासा