भारत विरुद्ध न्यूझीलंड टी २० मालिकेनंतर क्रमवारीत होणारे बदल !

उद्यापासून सुरु होत असलेल्या भारता विरुद्ध न्यूझीलंड संघातील टी २० मालिकेत भारताने जर न्यूझीलंडला या मालिकेत व्हाईट वॉश दिला तर भारतीय संघ दुसऱ्या स्थानी येईल तसेच यामुळे पाकिस्तान संघालाही अव्वल स्थानी विराजमान होण्यास मदत होईल. सध्या न्यूझीलंड संघ अव्वल स्थानी आहे. तर भारतीय संघ ११६ गुणांसह पाचव्या स्थानी आहे.

– जर भारत मालिका ३-० असा जिंकली तर भारताचे १२२ गुण होतील आणि ते दुसऱ्या स्थानी येतील तसेच पाकिस्तान १२४ गुणांसहित अव्वल स्थानी विराजमान होईल आणि न्यूझीलंडला आपले गुण गमवावे लागून ते १२५ गुणांवरून ११४ गुणांवर येतील आणि पाचव्या स्थानी त्यांची घसरण होईल.

– जर भारत मालिका २-१ ने जिंकली तर भारताचे ११८ गुण होतील परंतु तो पाचव्या स्थानिक कायम राहील मात्र न्यूझीलंडला आपले अव्वल स्थान गमवावे लागेल आणि पाकिस्तान अव्वल स्थानी येईल.

– जर भारत मालिका २-१ ने हरला तर न्यूझीलंड आपले अव्वलस्थान आणखी भक्कम करेल परंतु भारत एक गुण गमावून आपले पाचवे स्थान कायम ठेवेल.

– जर भारत मालिका ३-० ने हरला तर भारताची १११ गुणांसह सहाव्या स्थानी घसरण होईल.तर न्यूझीलंड १३२ गुणांसह अव्वल स्थानावर कायम राहील.