न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय

दिल्ली । भारत विरुद्ध न्यूजीलँड पहिल्या टी२० सामन्यात आज न्यूजीलँड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईकर श्रेयस अय्यरचे हे आंतरराष्ट्रीय पदार्पण असून आशिष नेहराचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना आहे.

भारत विरुद्ध न्यूजीलँड यांच्यात आजपर्यंत ५ सामने झाले असून पाचही सामने न्यूजीलँड संघ जिंकला आहे. आजपर्यंत झालेल्या ५ पैकी ५ सामन्यात एमएस धोनी खेळला आहे.

भारतीय संघ:
रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, एमएस धोनी, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, आशिष नेहरा, युझवेन्द्र चहल, जसप्रीत बुमराह