क्रिकेट इतिहासात अशी कामगिरी आजपर्यंत कुणालाही जमली नाही!

आयर्लंड दौऱ्यावर गेलेल्या न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाने एक अनोखा विक्रम केला आहे.

न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत आयर्लंड महिला संघाला या मालिकेत 3-0 असा व्हाइट वॉश देत आणखी एक जागतिक विक्रम केला आहे.

या मालिकेतील तिन्ही एकदिवसीय सामन्यात 400 पेक्षा अधिक धावा करत, सलग तीन सामन्यात 400 पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे.

यापूर्वी जगातील महिला व पुरूष अशा कोणत्याही संघाला अशी कामगिरी करता आली नाही. न्यूझीलंड संघाने या संपूर्ण मालिकेत आयर्लंड संघाची त्यांच्या घरच्या मैदानार तुफान धुलाई केली.

या मालिकेतील तीन सामन्यात न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करत अनुक्रमे पहिल्या 490/4, दुसऱ्या 418/10 आणि तिसऱ्या 440/3 एकदिवसीय सामन्यात चारशे पेक्षा अधिक धावा करण्याचा जागतिक विक्रम केला.

तसेच तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडच्या 17 वर्षीय अॅमेलिया केरने महिला क्रिकेटमधिल 21 वर्ष अबाधित राहिलेला सर्वोंच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रमही मोडीत काढला. अॅमेलिया केरने 1997 साली ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्कने केलेल्या 229* धावांचा विक्रम मोडत महिला क्रिकेटमध्ये सर्वोंच्च धावा करणारी फलंदाज ठरली.

महत्त्वाच्या बातम्या:

टाॅप ५- कसोटीच्या पहिल्याच दिवशी लंचपुर्वी शतकी खेळी करणारे खेळाडू

न्यूझीलंडच्या महिला क्रिकेटरने मोडला स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागचा विक्रम

टाॅप४- या संघांसोबत केले आहे सर्वाधिक संघांनी कसोटी पदार्पण