निर्णायक सामन्यात न्यूझीलंडचा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय

कानपुर| आज कानपुरच्या ग्रीनपार्क स्टेडिअमवर भारत विरुद्ध न्यूजीलँड संघातील ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात न्यूझीलँड संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने ६ विकेट्सने विजय मिळवला होता. या सामन्यात भारताचा सलामीवीर शिखर धवन आणि मधल्या फळीतील फलंदाज दिनेश कार्तिकने अर्धशतकी खेळी करून भारताला विजय मिळवून दिला होता.

या मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. सध्या मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. त्यामुळे आज होणारा सामना निर्णायक ठरणार आहे. आज जो संघ विजयी होईल तो संघ मालिकाही जिंकेल.

न्यूझीलंड संघ भारतात एकदाही मालिका जिंकला नसल्याने ते या सामन्यात जिंकण्याचा प्रयत्न करतील. तसेच जर भारतीय संघ या सामन्यात जिंकला तर भारतीय संघ सलग सातवी मालिका जिंकेल. 

असे आहेत आजचे संघ:

भारतीय संघ: विराट कोहली(कर्णधार),रोहित शर्मा, शिखर धवन, केदार जाधव, एम.एस.धोनी, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल.

न्यूजीलँड संघ: केन विलिअमसन(कर्णधार),ट्रेंट बोल्ट,कॉलिन द ग्रॅंडहोम,मार्टिन गप्टिल, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स,कॉलिन मुनरो, मिचेल सॅन्टनेर, टीम साऊथी,रॉस टेलर, ऍडम मिल्ने