इंग्लंडचा हा दिव्यांग फलंदाज मारतो एका हाताने षटकार-चौकार

जर तुमच्याकडे प्रबळ इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट तुमच्या प्रवासात अडचण ठरु शकत नाही.

हे वाक्य इंग्लिश फलंदाज मॅट अस्किनला तंतोतंत लागू होते. मॅट अस्किन इंग्लंडच्या दिव्यांग क्रिकेट संघाचा नियमित सदस्य आहे. डावा हात नसुनही चौकार आणि षटकार मारण्यात मॅट अस्किन मागे नाही. त्याने कित्येक वेळा इंग्लंडला एकतर्फी विजय मिळवून दिले आहेत.

या मॅट अस्किनच्या क्रिकेटच्या प्रवासाचा एक व्हीडीओ इंग्लंड क्रिकेट मंडळाने ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला आहे. व्हीडीओमध्ये अस्किनचा दिनक्रम आणि त्याच्या क्रिकेटचे कौशल्य दाखवले आहे. यामध्ये  मॅट अस्किनची क्रिकेटची आवड आणि क्रिकेटबद्दलचे प्रेम दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-फिफा विश्वचषक: तिसऱ्या स्थानासाठी बेल्जियम – इंग्लंड आज लढणार

-भारताला वनडे मालिकेत विजयी आघाडी घेण्याची संधी