नेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम

महान फुटबॉलपटू पेले यांचा ब्राझिलकडून सर्वाधिक आतंरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम नेमार ज्युनियरने मोडला आहे. त्याने या आठवड्यात दोन सामने खेळताना पेले यांचा ९२ सामन्यांचा विक्रम मागे टाकला आहे.

नेमारने ब्राझिलकडून ९३वा सामना सौदी अरेबिया तर चार दिवसांच्या फरकाने ९४वा सामना अर्जेंटीना विरुद्ध खेळला आहे.

या विक्रमाबद्दला पेलेंनी नेमारचे अभिनंदन करत माझा गोलचा विक्रमही मोड, असे आव्हानही केले आहे.

पेले यांनी १९५७-७१ या दरम्यान ब्राझिलकडून खेळताना ९२ सामन्यांमध्ये सर्वाधिक असे ७७ गोल केले आहेत. तर नेमारला त्यांचा गोलचा विक्रम मोडण्यासाठी अजून अधिक १९ गोल करण्याची गरज आहे.

तसेच ब्राझिलकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करण्यामध्ये पेले पहिल्या क्रमांकावर आहे. तर रोनाल्डो नझारियो ९८ सामन्यात ६२ गोल करत दुसऱ्या आणि नेमार ५८ गोलसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

तसेच सध्या खेळत असलेल्या फुटबॉलपटूंमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करण्यामध्ये पोर्तुगलचा क्रिस्तियानो रोनाल्डो १५४ सामन्यांत ८५ गोलसह पहिल्या, अर्जेंटीनाचा लियोनल मेस्सी १२८ सामन्यांमध्ये ६५ गोल  आणि भारताचा सुनिल छेत्रीने १०३ सामन्यांतच ६५ गोल केले असून ते दोघे संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे. तर स्पेनच्या डेव्हीड विलाने ५९ गोल केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना

Video: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली

ISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक