टॉप ५: स्पॉट किकसाठी झालेले वाद जे खूप चर्चिले गेले

फुटबॉल जगतातील सर्वात महागडा खेळाडू नेमार आणि त्याचा पॅरिस सेंट जर्मेन संघातील सहकारी खेळाडू कावानी यांच्यात लीऑन विरुद्ध झालेल्या सामन्यात पेनल्टी किक घेण्यावरून ‘तू- तू मैं- मैं’ झाली. एकाच संघातील खेळाडू संघातील इतर सहकाऱ्यांना भावाचा दर्जा फुटबॉलमध्ये नेहमीच देत आलेले आहेत. परंतु त्या सामन्यातील घटनेने फुटबॉल जगतातील दुसरी बाजू उघड केली आहे.

# नेमार आणि कावानी

विक्रमी रक्कम मिळवत पॅरिस सेंट जर्मेन संघात सहभागी झालेला नेमार याला त्याच्या सहकारी खेळाडूंनी त्याचे स्वागत केलेले आपण पहिले होते. परंतु लीऑन विरुद्धच्या सामन्यात पॅरिस संघाला प्रथमता फ्री किक मिळाली त्यावेळी पॅरिस संघातील ब्राझेलीयन डॅनी अल्वेस याने कावानी याच्या हातातून बॉल हिसकावून नेमारकडे दिला. या सामन्यात काही वेळेने पॅरिस संघाला पेनल्टी मिळाली ती कावानी घेण्यासाठी आला होता. त्यावेळी नेमार पुढे आला आणि त्याने पेनल्टी घेण्यास विचारले. त्यावेळी कावानीने त्याला सरळ नकार दिला. त्याने ही पेनल्टी घेतली आणि वाया देखील घालावी. हा वाद जगभरात खूप चर्चेचा विषय बनतो आहे.

# एरीक लामेला आणि सन हेऊंग मिन
मागील वर्षी इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये मँचेस्टर सिटी विरुद्ध टॉटिंघम हॉट्स्पुर्स या संघात होता. स्पुर्स संघाला पेनल्टी मिळाली. सामन्यात स्पुर्स संघातील मुख्य खेळाडू हॅरी केन जखमी असल्याने ही पेनल्टी अन्य खेळाडू घेणार होता. त्यावेळी एरीक लामेला पेनल्टी घेण्यासाठी आला परंतु साऊथ कोरियन सन हेऊंग मिन याने पुढे येत पेनल्टी घेण्याची उत्सुकता दाखवली. रेफ्रीने पेनल्टी मारण्यासाठीची शिट्टी वाजवली तरी या दोन खेळाडूतील वाद चालूच होता. या वादात लामेलाने पेनल्टी घेतली पण तो गोल करण्यात अपयशी ठरला. हा वाद स्पुर्स संघाचे पाठीराखे कधीच विसरू शकत नाहीत.

# फ्रॅंक लैम्पार्ड आणि पाउलो डी कॅनिओ
ही गोष्ट आहे लैम्पार्डच्या सुरुवातीच्या काळातील जेव्हा तो वेस्टहम संघासाठी खेळायचा. याच संघात इटलीचा पाउलो डी कॅनिओ देखील खेळायचा. पाउलो डी कॅनिओ त्याच्या रागामुळे फुटबॉल विश्वात ओळखला जातो. वेस्टहम संघाचा सामना ब्रॅडफोर्ड विरुद्ध होता. या सामन्यात वेस्टहम ३-२ ने मागे होते. त्यांना पेनल्टी मिळाली. ती पेनल्टी घेण्यासाठी युवा फ्रॅंक लैम्पार्ड पुढे आला. परंतु पाउलो डी कॅनिओ बॉक्समध्ये आला आणि त्याने लैम्पार्डच्या हातातील बॉल हुसकावून घेतला. त्याला संघातील संहकाऱ्यानी विरोध केला परंतु त्याने कोणाचे ऐकले नाही. त्या पेनलटीमध्ये त्याने गोल जरूर केला. हा सामना वेस्टहमने ५-४ असा जिंकला.

# मारिओ बालाटोली आणि कोलॅरॉव अलेक्सेंडर
सुपर मारिओ या नावाने काही काळ फुटबॉलमध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर असणारा या इटलीच्या खेळाडूच्या जीवनात खूप वाद आहेत. मँचेस्टर सिटीसाठी खेळताना देखील मारिओला वादाला सामोरे जावे लागले. सदरलँड विरुद्ध सामन्यात सिटीला बॉक्सच्या बाहेर फ्री किक मिळाली. त्यावेळी मारिओ फ्री किक घेण्यासाठी आला. परंतु सर्बियन खेळाडू कोलॅरॉव अलेक्सेंडर पुढे येत फी किकसाठी बॉल घेतला. त्यावेळी चिडलेला मारिओ त्याच्या अंगावर येत असलेला पाहून सिटी संघातील खेळाडू कोलॅरॉवच्या मदतीला धावून आले. चार खेळाडू मारिओ बेलाटोली यातला शांत करताना पाहण्याचा प्रसंग फुटबॉल जगताने अनुभवाला.

यदाकदाचित आपणास माहिती नसेल तर
स्पॉट किक म्हणजे काय?
एखाद्या खेळाडूला चुकीच्या पद्धतीने रोखण्याचा किंवा अडथळा आणण्याचा प्रयन्त केला तर पंच सामना थांबवतो. त्यावेळी ज्या खेळाडूला चुकीच्या पद्धतीने रोखण्यात आले आहे त्या संघाकडे फुटबॉलचा ताबा देऊन खेळ पुन्हा त्याच विशिष्ट जागेवरून किक करण्याची संधी दिली जाते त्याला ‘स्पॉट किक’ म्हणतात. जर ती स्पॉट किक बॉक्समध्ये मिळाली तर त्याला ‘पेनल्टी’ म्हटले जाते आणि जर बॉक्सच्या बाहेर मिळाली तर त्याला ‘फ्री किक’ म्हणून संबोधले जाते.