माफीच्या व्हिडिओमधून नेमारने कमावली एवढी रक्कम

ब्राझिल आणि पॅरीस सेंट-जर्मन संघाचा स्टार फुटबॉलपटू नेमार ज्युनियरने त्याच्या माफीच्या व्हिडिओमधून 266,000 डॉलर कमावले आहे.

रशिया फिफा विश्वचषकात मैदानावरील नाटकांची नेमारने एका जाहिरातीमार्फत कबुली दिली आहे. 90 सेंकदाच्या या जाहिरातीमध्ये त्याने कशाप्रकारे चूक मानली आणि टिकांचा सामना केला, हे दाखवले आहेत. तसेच त्याने आपण आता बदलण्याचा प्रयत्न करत आहोत हे ही म्हटले आहे.

नेमारने ट्विटरवर एक व्हिडिओ शेयर करून त्यामध्ये त्याने अत्यंत भावूक विचार मांडले आहेत.

“तुम्ही माझ्यावर रागवा, बोला पण मला उभे राहण्यास मदत करा. जेव्हा मी उभा राहिल तेव्हा पुर्ण ब्राझिल माझ्यासोबत उभा राहिल, असे तो म्हणाला.

“तुमच्या टिकांना मानण्यात मला खुप वेळ लागला. मला त्या परिस्थितीतून पुढे येण्यास जास्त कालावधी लागला”, असे नेमार म्हणाला.

नेमारने जाहिरातीमध्ये केलेल्या विधानांमुळे सध्या जास्त चर्चेत आला आहे. यासाठी त्याने त्या जाहिरात कंपनीशी 1 मिलियन ब्राझिलियनचा व्यवहार केल्याचे ब्राझिलच्या वृत्तपत्रामध्ये उघडकीस आले आहे.

ब्राझिल संघ विश्वचषकाबाहेर पडण्यापुर्वी नेमारने या स्पर्धेत 5 सामन्यात 2 गोल केले.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

नेमारची आई म्हणते,’भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे

विराट, जो रुट नव्हे तर केएल राहुलच जगातील सर्वोत्तम फलंदाज