पुणे: कॉर्पोरेट महिला व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेत इन्फोसीस, कॅपजेमिनि संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश

पुणे | सुहाना प्रवीण मसालेवाले आणि लक्ष्य यांच्या संलग्नतेने आयोजित सुहाना लक्ष्य कॉर्पोरेट महिला व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेत इन्फोसीस संघाने कॅग्निझंट संघाचा तर कॅपजेमिनि संघाने टीसीएस संघाचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

सिम्बायोसिस स्कुल, प्रभात रोड येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पल्लवी बॅनर्जीच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर इन्फोसीस संघाने कॅग्निझंट संघाचा 2-0(25-18, 25-10) असा एकतर्फी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

श्वेता अरोराच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर कॅपजेमिनि संघाने टीसीएस संघाचा 2-0(25-17, 25-9) असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. असेंचर संघाने टेक महिंद्रा संघाचा 2-0(25-20, 25-23) असा तर अॅमडॉक्स संघाने सिंटेल संघाचा 2-0 (25-14, 25-21) असा पराभव केला.

स्पर्धेचा सविसेतर निकाल – साखळी फेरी

इन्फोसीस वि.वि कॅग्निझंट 2-0(25-18, 25-10) सामनावीर – पल्लवी बॅनर्जी

कॅपजेमिनि वि.वि टीसीएस 2-0(25-17, 25-9) सामनावीर – श्वेता अरोरा

असेंचर वि.वि टेक महिंद्रा 2-0(25-20, 25-23) सामनावीर- संप्रिती नाथ

अॅमडॉक्स वि.वि सिंटेल 2-0 (25-14, 25-21) सामनावीर शाहिनी शेरीन