रैनाने मोडला माजी कॅप्टन कूल धोनीचा एक खास विक्रम

कोलंबो। काल निदाहास ट्रॉफी तिरंगी टी २० मालिकेत भारताने श्रीलंकेवर ६ विकेट्सने विजय मिळवून एक खास विक्रम रचला आहे. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर सामनावीराच्या पुरस्काराचा मानकरी ठरला.

कालच्या विजयाबरोबरच भारताने आंतराष्ट्रीय टी २० मध्ये श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक वेळा विजय मिळवण्याचा विक्रम केला आहे. भारताने आजपर्यंत श्रीलंकेला ११ वेळा पराभूत केले आहे.

काल धावांचा पाठलाग करताना सुरेश रैनाने भारतीय संघाकडून एक जबाबदार खेळीचे दर्शन घडवले. त्यात त्याने  १५ चेंडूत २७ धावा करण्याला धावसंख्येला आकार दिला. 

हे करताना  रैनाने माजी कॅप्टन कूल धोनीचा एक खास विक्रम एक विक्रमही मोडलाय. तो म्हणजे अांतरराष्ट्रीय टी२० सामन्यात भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या स्थानावर झेप घेण्याचा. 

रैनाने भारताकडून ७१ सामन्यात खेळताना ६१ डावात २९.०४ च्या सरासरीने १४५२ धावा केल्या आहेत. तर धोनीने ८९ सामन्यात ७८ डावात ३७.०२ च्या सरासरीने १४४४ धावा केल्या आहेत.

भारताकडून अांतरराष्ट्रीय टी२० सामन्यात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

१९८३ विराट कोहली (सामने- ५७)

१७०७ रोहीत शर्मा (सामने- ७७)

१४५२ सुरेश रैना (सामने- ७१)

१४४४ एमएस धोनी (सामने- ८९)

११७७ युवराज सिंग (सामने- ५८)