पहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत आस्मि आडकर, अभिराम निलाखे यांना विजेतेपद  

पुणे | पुणे महानगर पालिका यांच्या तर्फे व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली पहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत 12वर्षाखालील मुलींच्या गटात आस्मि आडकर हिने तर, मुलांच्या गटात अभिराम निलाखे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत मुलींच्या गटात बिगरमानांकीत आस्मि आडकर हिने सहाव्या मानांकित सिया प्रसादेचा 4-0, 4-1असा पराभव करून विजेतेपद मिळवले. याआधीच्या उपांत्य फेरीच्या लढतीत आस्मि आडकर हिने अव्वल मानांकित श्रावणी देशमुखचा 5-1असा तर, सहाव्या मानांकित सिया प्रसादेने अवनी चितळेचा 5-1असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.

मुलांच्या गटात अंतिम फेरीच्या सामन्यात चौथ्या मानांकित अभिराम निलाखे याने अव्वल मानांकित अर्जुन कीर्तनेचा टायब्रेकमध्ये  4-2, 4-3(6)असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. उपांत्य फेरीच्या सामन्यात अव्वल मानांकित अर्जुन कीर्तनेने तिसऱ्या मानांकित अद्विक नाटेकरचा टायब्रेकमध्ये 5-4(4)असा संघर्षपूर्ण पराभव केला. चौथ्या मानांकित अभिराम निलाखे याने सहाव्या मानांकित अमन शाहचा 5-2असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: 12 वर्षाखालील मुली:उपांत्य फेरी:
आस्मि आडकर वि.वि.श्रावणी देशमुख(1)5-1;
सिया प्रसादे(6)वि.वि.अवनी चितळे 5-1;

अंतिम फेरी: आस्मि आडकर वि.वि.सिया प्रसादे(6)4-0, 4-1;

12 वर्षाखालील मुले: उपांत्य फेरी:

अर्जुन कीर्तने(1)वि.वि.अद्विक नाटेकर(3)5-4(4);
अभिराम निलाखे(4)वि.वि.अमन शाह(6) 5-2;

अंतिम फेरी: अभिराम निलाखे(4)वि.वि.अर्जुन कीर्तने(1) 4-2, 4-3(6).