विश्वचषकात भाग घेणाऱ्या १०पैकी ९ संघाचा पुढील ५ आठवड्यांत वनडे सामन्यांचा रतीब

मुंबई | बुधवारपासून न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश वनडे मालिकेला सुरुवात होत आहे. या दौऱ्यात बांगलादेश ३ वनडे आणि ३ कसोटी सामने न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. १३ फेब्रुवारी ते ३० मार्च या काळात हे सामने होणार आहेत.

तसेच उद्यापासून श्रीलंका संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी मालिकेत खेळणार आहे. या दौऱ्यात लंका २ कसोटी, ५ वनडे आणि ३ टी२० सामने खेळणार आहे. ही मालिका १३ फेब्रुवारी ते २४ मार्च या काळात होणार आहे.

२२ मार्च ते ३१ मार्च या काळात पाकिस्तान ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुबईत ५ वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे.

याचबरोबर फेब्रुवारी, मार्च महिन्यात टीम इंडिया भारतातच ऑस्ट्रेलियाबरोबर वनडे तसेच टी२० मालिका खेळणार आहे.

मे महिन्यात वेगवेगळे संघ तब्बल ७ आंतरराष्ट्रीय मालिकांमध्ये भाग घेणार आहेत. यात इंग्लंड विरुद्ध आयर्लंड, अफगाणिस्तान विरुद्ध स्काॅटलंड, विंडीज, बांगलादेश आणि आयर्लंड तिरंगी मालिका, पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड, श्रीलंका विरुद्ध स्काॅटलंड आणि अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड मालिकांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

सुरेश रैनाच्या निधनाच्या सर्व बातम्या खोट्या, स्वत: रैनानेच केला खुलासा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित शर्माबद्दल होणार हा निर्णय

अखेर फॅब४ मधील जो रुटने किंग कोहलीचा विक्रम मोडलाच, चारही खेळाडूंमधील स्पर्धा वाढली

मुंबईकर अजिंक्य रहाणे विरुद्ध मुंबईकर वसिम जाफर येणार आमने-सामने