प्रो कबड्डी सीजन ७ साठी युवा नितेश कुमार युपी योद्धाचा कर्णधार

प्रो कबड्डी सीजन ७ साठी यूपी योद्धा संघाने नवीन कर्णधारची घोषणा केली आहे. नवीन सीजन साठी यूपी योद्ध्याची धुरा युवा डिफेंडर नितेश कुमारकडे सोपवली आहे. नितेश कुमार हा सीजन ६ मध्ये (एनवायपी) म्हणून पहिल्यादाच प्रो कबड्डी खेळला.

आपल्या पहिल्याच सीजन मध्ये नितेशने जबरदस्त खेळ करत युपी योद्धा संघाला प्लायऑफ्स मध्ये जाण्यासाठी मोठे योगदान दिले होते. नितेश कुमारने सीजन ६ मध्ये सर्वाधिक १०१ पकडीत गुण मिळवले होते. एकाच सीजन मध्ये १०० पकडीत गुण मिळवणारा प्रो कबड्डीतील एकमेव खेळाडू आहे.

यूपी योद्धाचे प्रशिक्षक अर्जुन सिंह यांनी सांगितले, “जो खेळाडू बचावासाठी खेळतो तो त्याच्या संघाला वेळोवेळी सांगू शकतो. कोणता खेळाडू चूक करत आहे ते तो सांगू शकतो.

प्रशिक्षक म्हणाले की, “डिफेंडर रेडरपेक्षा चांगली परिस्थिती समजून घेऊ शकतो, म्हणून त्याला कर्णधार म्हणून निवडण्यात आले आहे.” नीतेश एक स्टार खेळाडू आहे. त्यांनी भारतीय ज्युनियर संघाचे ही प्रतिनिधित्व केले आहे आणि तो एक चांगला खेळाडू आहे. ”

प्रो कबड्डी सीजन ७ ला २० जुलै २०१९ पासून हैदराबाद येथे सुरुवात होत आहे. यूपी योद्धाचा पहिला सामना २४ जुलै ला बंगाल वाररिर्स विरुद्ध होणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

पुणेरी पलटनच्या कर्णधारपदी सुरजीत सिंगची नेमणूक, टीमच्या नव्या जर्सीचेही झाले आनावरण

मुंबईत १९ वा कबड्डी दिन सोहळा संपन्न