प्रो-कबड्डीला टक्कर देण्यासाठी नव्या कोऱ्या कबड्डी लीगची घोषणा

न्यु कबड्डी फेडरेशन आॅफ इंडियाने इंडो इंटरनॅशल कबड्डी लीगची घोषणा केली आहे. भारताच्या खराखुऱ्या कबड्डी खेळाचा भारतातील आणि जगातील चाहत्यांपर्यंत हा खेळ पोहचविण्याचे लक्ष याद्वारे ठेवण्यात आले आहे.
भारतातील अनेक माजी अर्जून पुरस्कार विजेत्या कबड्डीपटूंनी न्यु कबड्डी फेडरेशन आॅफ इंडियाची स्थापना केली असुन यातूनच या लीगच जन्म होत आहे.
या लीगसाठी २ वेळचे एशियन गेम्स विजेते एस राजारामन, विश्वचषक विजेते सुरेश कुमार, मुरुगनाथम, मधुकर यादव, सी होनप्पा आणि अनेक माजी दिग्गज खेळाडू सरसावले आहेत.
दीड महिन्यात ८ संघात तब्बल ६२ सामने या लीगच्या माध्यमातून खेळवले जाणार आहेत. प्रत्येक संघात ३ किंवा ४ परदेशी खेळाडू असणार आहेत. हे सर्व सामने ४ शहरांत होण्याची शक्यता आहे. यात मुंबई आणि बेंगलोरसारख्या मोठ्या शहारांऐवजी दुसऱ्या शहरांना प्राधान्य दिले जाणार आहे.
परदेशी खेळाडूंमध्ये न्यूझीलंड, पोलंड, अर्जेंटीना, टांझानिया, आॅस्ट्रेलिया, नाॅर्वे, इंग्लंड, कॅनडा, अमेरीका, पाकिस्तान, इराण, बांगलादेश, श्रीलंका, मेक्सिको, माॅरिशस, केनिया, इराक, डेन्मार्कसह भारतातील खेळाडू खेळताना दिसतील.
ही लीग डिसेंबर महिन्यात होणार आहे. यातील सर्व सामने हे डिस्कवरीच्या डी स्पोर्ट्स या चॅनेलवर दाखविण्यात येणार आहेत.
“कबड्डी खेळ हा भारतात चांगला वाढत आहे. तसेच चाहत्यांचे या खेळाबद्दलचे प्रेम दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे नविन लीगमुळे या खेळाला याचा नक्की फायदा होईल.” असे यावेळी न्यु कबड्डी फेडरेशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष सर्वेश कुमार म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
– एशियन गेम्स: भारताला मिश्र रिलेत ऐतिहासिक रौप्यपदक
– …तुम्ही क्रिकेटमधील धावांप्रमाणे हाॅकीत गोल करता!!!
–भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या कसोटीत या ५ विक्रमांकडे दुर्लक्ष…
– आफ्रिदीला ‘बूम-बूम’ हे फेमस टोपण नाव देणारा कोण होता तो भारतीय खेळाडू
–लक्ष्मणच्या ड्रीम ११मध्ये मुरली विजयसह काही धक्कादायक नावे
-कोहली आता तरी तो ‘नकोसा’ विक्रम टाळणार का?
-विराटसाठी चौथा कसोटी सामना खास, होणार एक ‘किंग’ रेकाॅर्ड