एका वर्षात कर्णधार म्हणून अशी कामगिरी करणारा विराट एकमेव !

कानपुर । भारतीय कर्णधार विराट कोहलीने यावर्षी वनडेत ६ शतके केली आहेत. कर्णधार म्हणून एका वर्षात सर्वाधिक शतके करणार्याचा विक्रम आता विराटच्या नावावर झाला आहे.

यापूर्वी सौरव गांगुली, रिकी पॉन्टिंग, ग्रॅमी स्मिथ आणि एबी डिव्हिलिअर्स यांनी एका वर्षात कर्णधार म्हणून ५ शतके केली होती.

विराटने यावर्षी भारताकडून २६वनडेत खेळताना ७६.८४ च्या सरासरीने १४७३ धावा केल्या आहेत. त्यात त्याने ६ शतके आणि ७ अर्धशतके केली आहेत.

भारतीय संघ यावर्षी २६ सामने खेळला आहे त्यातील प्रत्येक सामन्यात विराटने भाग घेतला आहे.

भारतीय संघ २६ पैकी जे १९ सामने जिंकला आहे त्यात विराटने ९४.०७च्या सरासरीने १२२३ धावा केल्या आहेत.

विराटच्या ६ शतकी खेळीपैकी ५वेळा भारतीय संघ विजयी झाला आहे तर ७ अर्धशतकी खेळी पैकी १ खेळी केवळ व्यर्थ गेली आहे.

कर्णधार म्हणून एका वर्षात सार्वधिक शतके करणारे खेळाडू
६ विराट कोहली २०१७, सामने-२६
५ सौरव गांगुली २०००, सामने-२५
५ रिकी पॉन्टिंग २००३, सामने-३४
५ ग्रॅमी स्मिथ २००५, सामने-२२
५ रिकी पॉन्टिंग २००७, सामने-२७
५ एबी डिव्हिलिअर्स २०१५, सामने-२०