विंडीजविरुद्ध होणाऱ्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया

बीसीसीआय निवड समितीने शुक्रवारी(26 आॅक्टोबर) विंडीज विरुद्ध आणि आॅस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या प्रत्येकी 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.

भारताने आजच विंडीजविरुद्ध वन-डे मालिका ३-१ अशी जिंकली. त्यात कर्णधार विराट कोहलीला मालिकावीर म्हणुन गौरविण्यात आले.

टी२० मालिकेसाठी भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचा समावेश करण्यात आलेला नाही. याबद्दल निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी सांगितले की ‘धोनी पुढील 6 टी20 सामने खेळणार नाही. आम्ही पर्यायी यष्टीरक्षकांना तपासत आहोत. पण हा धोनीचा टी20 मधील शेवट नाही.’

धोनी ऐवजी रिषभ पंतला यष्टीरक्षक म्हणून दोन्ही टी20 मालिकांसाठी संधी देण्यात आलेली आहे.

त्याचबरोबर 4 नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या विंडीज विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या ऐवजी रोहित शर्मा भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार असेल.

विराट 21 नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या आॅस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघात पुनरागमन करेल. आॅस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात टी20 मालिकेपासून होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व विराट करेल.

तसेच या दोन्ही मालिकांसाठी भारतीय संघात कृणाल पंड्या आणि वॉशिंगटन सुंदरची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर विंडीज विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी शाहबाज नदीमलाही संधी देण्यात आली आहे.

असा आहे 4 नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या विंडीज विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ-

रोहित शर्मा(कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, दिनेश कार्तिक, मनिष पांडे, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, कृणाल पंड्या, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, उमेश यादव, शहाबाज नदीम.

असा आहे 21 नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या आॅस्ट्रेलिया विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ-

विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, दिनेश कार्तिक, मनिष पांडे, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, कृणाल पंड्या, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, उमेश यादव.

महत्त्वाच्या बातम्या:

सव्वादोन तासात भारतीय गोलंदाजांनी असा काही कारनामा केला की कुणी विचारही केला नसेल

ही दोस्ती तुटायची नाय… काय आहे या खास मैत्रीचे कारण?

ती एक धाव आणि ती एक विकेट… धोनी-भुवीला पडली भलतीच महागात