आज एमएस धोनी ऐवजी चेन्नई सुपर किंग्सने नेतृत्व करणार हा खेळाडू

हैद्राबाद। आज आयपीएल 2019 मध्ये सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात सामना होणार आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी खेळणार नसल्याने सुरेश रैना नेतृत्व करणार आहे.

धोनीने या सामन्यात विश्रांती घेतली आहे. त्यामुळे जवळ जवळ 9 वर्षांनंतर धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या सामन्याला मुकणार आहे. तो याआधी शेवटचा 23 मार्च 2010 ला चेन्नई सुपर किंग्सच्या सामन्याला मुकला होता.

या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या सामन्यासाठी चेन्नईच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत. चेन्नई संघात मिशेल सँटेनर ऐवजी कर्ण शर्माला संधी मिळाली आहे. तर धोनीऐवजी सॅम बिलिंग्स संघात आला आहे.

त्याचबरोबर हैद्राबादनेही दोन बदल केले असून त्यांनी रिकी भुई आणि अभिषेक शर्मा ऐवजी युसुफ पठाण आणि शाहाबाज नदीमला अंतिम 11 जणांच्या संघात संधी दिली आहे.

असे आहेत 11 जणांचे संघ – 

चेन्नई सुपर किंग्स – शेन वॉटसन, फाफ डु प्लेसिस, सुरेश रैना (कर्णधार), सैम बिलिंग्स (यष्टीरक्षक), अंबाती रायडू, केदार जाधव, रवींद्र जडेजा, कर्ण शर्मा, दीपक चहर, शार्दुल ठाकुर, इम्रान ताहिर

सनरायझर्स हैद्राबाद – डेविड वार्नर, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), केन विलियम्सन (कर्णधार), विजय शंकर, यूसुफ पठाण, दीपक हुड्डा, राशिद खान, शाहबाज नदीम, भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा, खलील अहमद.

महत्त्वाच्या बातम्या –

विश्वचषकासाठी संघात जागा न मिळाल्याने या खेळाडूला आवरता आले नाही अश्रू, पहा व्हिडिओ

विश्वचषकासाठी संघात जागा न मिळालेल्या रायडू, पंतसाठी ही आहे आनंदाची बातमी

२०१९ विश्वचषकासाठी इंग्लंड संघाची घोषणा, जोफ्रा आर्चरला संधी नाही