धोनीने जर सांगितलं तर मी डोळे झाकून दोन धावा घेतो: विराट कोहली

दिल्ली । भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि सध्याचा कर्णधार विराट कोहली हे धावा घेताना एकमेकांना अतिशय चांगले ओळखतात असे कोहली म्हणतो.

गौरव कपूरच्या ब्रेकफास्ट विथ चॅम्पिअन्स या कार्यक्रमात बोलताना कोहली म्हणाला, ” धोनी आणि मी जेव्हा वनडेत खेळत असतो आणि जेव्हा तो मला  म्हणतो की दोन धावा घ्यायच्या आहे तेव्हा मी डोळे झाकून धावतो. कारण धोनीचे यातील अंदाज अतिशय परिपूर्ण असतात. त्याचा अंदाज चुकत नाही. “

याबरोबर कसोटीत अजिंक्य राहणे तर टी२० मध्ये एबी डिव्हिलिअर्स आणि ख्रिस गेलबरोबर फलंदाजी करताना मजा येते. वनडेत रोहित शर्मा आणि शिखर धवन बरोबर आपल्याला खेळायला आवडते. पण विशेष आनंद खेळपट्टीवर धोनी असताना येत असल्याचे विराटने अधोरेखित केलं आहे.

धोनी आता तुला कर्णधार म्हणून कशी मदत करतो असे विचारले असता विराट म्हणाला, ” मी जेव्हाही त्याला काही विचारतो तेव्हा १० पैकी ९वेळा गोष्टी बरोबर होता. तो योग्य नियोजन करण्यात तरबेज आहे. “