विजय शंकरच्या दुखापतीबद्दल असा आला रिपोर्ट, बीसीसीआयने दिली माहिती

2019 विश्वचषकाला येत्या गुरुवारपासून(30 मे) सुरुवात होणार आहे. पण हा विश्वचषक सुरु होण्याआधीच भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू विजय शंकर शुक्रवारी(24 मे) सराव सत्रा दरम्यान दुखापतग्रस्त झाला होता.

पण त्याची ही दुखापत गंभीर नसल्याची आज(25 मे) बीसीसीआने ट्विटरवरुन माहिती दिली आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.

बीसीसीआयने शंकरच्या दुखापतीबद्दल ट्विट केले आहे की ‘शुक्रवारी विजय शंकरच्या उजव्या हाताला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याच्या हाताचे स्कॅन करण्यात आले. या स्कॅनमध्ये कोणतेही फ्रॅक्चर नसल्याचे निश्चित झाले आहे. बीसीसीआयची वैद्यकीय टीम त्याच्यावर उपचार करत आहे.’

शंकरला शुक्रवारी फलंदाजीचा सराव करत असताना पुलशॉट खेळण्याच्या प्रयत्नात ही दुखापत झाली आहे. त्याला भारतीय संघाला नेटमध्ये सराव देण्यासाठी इंग्लंडला गेलेला वेगवान गोलंदाज खलील अहमदचा चेंडू लागला आहे.

या दुखापतीमुळे त्याचा आज न्यूझीलंड विरुद्ध होत असलेल्या सराव सामन्यासाठी भारताच्या संघात समावेश करण्यात आलेला नाही. मात्र तो या सामन्याआधी मैदानात उतरला होता. पण त्याच्या हाताला पट्टी बांधलेली होती. त्याच्याबरोबरच आजच्या सराव सामन्यासाठी केदार जाधवलाही विश्रांती दिली आहे. तोही नुकताच दुखापतीतून सावरला आहे.

त्यामुळे आता शंकर 28 मे ला बांगलादेश विरुद्ध होणाऱ्या भारताच्या दुसऱ्या सराव सामन्यात खेळणार की नाही हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विश्वचषक २०१९: एकाच दिवसात हे चार खेळाडू झाले दुखापतग्रस्त

जेव्हा क्रिकेट-फुटबॉलमधील दोन दिग्गज भेटतात एकमेंकांना…

इंग्लंडच्या माजी कर्णधाराला अजूनही वाटते या दोन भारतीय क्रिकेटपटूंची भीती…