कसोटी क्रिकेट चाहत्यांसाठी हे आहे नाराज करणारे वृत्त

दिल्ली।  आयसीसीने २०१९ ते २०२३ या ५ वर्षांचा भविष्यातील कार्यक्रम घोषीत केला आहे. यामध्ये पहिले कसोटी चॅंपियनशीपचे सामने हे दोन वर्षाच्या (2019-20) कालावधीत खेळवले जाणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 2021 मध्ये होणार असे आयसीसीने जाहीर केले आहे.

सगळ्यांनाच प्रतिक्षा असणारी ही स्पर्धा याआधी 2010 मध्ये तर नंतर दोनदा रद्द करण्यात आली होती. आत्ता होणाऱ्या या स्पर्धेत साखळी फेरीत मात्र भारत-पाकिस्तान हे एकमेकांना भिडणार नाही. जर हे दोन्ही संघ अंतिम फेरीस पात्र झाले तरच ते एकमेकांविरोधात खेळू शकतात.

यामध्ये पहिले नऊ संघ हे एकूण सहा कसोटी मालिका खेळणार आहेत. ह्या मालिका तीन घरच्या मैदानावर आणि तीन परदेशात बाकींच्या सहा देशांबरोबर होणार आहेत.

2 वर्षांत होणाऱ्या या स्पर्धेत एकूण 36 कसोटी सामने होणार आहेत.

झिम्बाब्वे, अफगानिस्तान आणि आर्यंलंड हे संघ या कसोटी चॅंपियनशीपमध्ये भाग घेणार नाही. कारण यावेळी हे  संघ द्विपक्षीय सामने खेळाणार आहेत.

भारत, पाकिस्तान बरोबरच बाकीचे सात संघ हे या कालावधीत दुसऱ्या संघांसोबत खेळणार आहेत. कोणता संघ कोणाबरोबर खेळेल हे फ्युचर टुर्स प्रोग्राम (एफ टी पी ) हे ठरवणार आहे. तसेच या नविन पध्दतीला आयसीसीचे सभासद असलेल्या सर्व देशांनी मंजूरी दिली आहे.

” भारत, पाकिस्तानच्या बाबतीत आम्हाला थोडे व्यवहारीक व्हावे लागेल. पहिल्या चरणात हे दोन देश कसोटी सामने खेळणार नाहीत, ” असे आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या –

टाॅप ७- आयपीएलमध्ये या खेळाडूंनी अर्ध्यातच सोडले कर्णधारपद, संघाचे पुढे काय झाले पहाच

सामना पराभूत झाला म्हणून काय झाले, त्याने जिंकली चाहत्यांची मने

आमदार चषक कबड्डी स्पर्धेत एअर इंडिया सलामीलाच कोलमडली