टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया…

भारतीय संघाने आज आॅस्ट्रेलियाच्या दोन महिन्यांच्या प्रदिर्घ दौऱ्यासाठी प्रयाण केले. भारतीय संघ या दौऱ्यात ३ टी२०, ४ कसोटी आणि ३ वन-डे सामने खेळणार आहे.

या दौऱ्यातील पहिला टी२० सामना २१ नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे.  या टी२० मालिकेत संघाचे नेतृत्व भारतीय संघाचा पुर्णवेळ कर्णधार विराट कोहली करणार आहे. विराटला विंडीजविरुद्ध झालेल्या टी२० मालिकेत विश्रांती देण्यात आली होती.

या दौऱ्यातील टी२० मालिकेतून भारताचा २००७चा विश्वचषक विजेता कर्णधार एमएस धोनीला वगळण्यात आले आहे. धोनी ऐवजी रिषभ पंतला यष्टीरक्षक म्हणून संधी देण्यात आलेली आहे.

२६ आॅक्टोबर रोजी भारतीय संघाची या मालिकेसाठी घोषणा करण्यात आली.

असा आहे 21 नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या आॅस्ट्रेलिया विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ-

विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, दिनेश कार्तिक, मनिष पांडे, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, कृणाल पंड्या, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, उमेश यादव.

अशी आहे टी२० मालिका- 

२१ नोव्हेंबर- पहिला टी२० सामना- ब्रिस्बेन

२३ नोव्हेंबर- दुसरा टी२० सामना- मेलबर्न

२५ नोव्हेंबर- तिसरा टी२० सामना- सिडनी

वाचा महत्त्वाच्या बातम्या-