२३९८ वनडे प्लेयर्सला जे जमले नाही ते रोहित शर्माने करून दाखवले

मोहाली । भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माने मोहाली वनडेत धमाकेदार द्विशतक करताना अनेक विक्रम केले. त्याचे हे वनडेत तिसरे द्विशतक होते. यापूर्वी रोहितने ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका संघाविरुद्ध द्विशतकी खेळी केली आहे.

वनडेत एका डावात सर्वोच्च धावा करण्याचा विक्रमही (२६४*) रोहितच्याच नावावर आहे. जागतिक क्रिकेटमध्ये वनडे प्रकारात आजपर्यंत २३९९ खेळाडूंनी भाग घेतला आहे. त्यातील केवळ ५ खेळाडूंना द्विशतके करता आली आहे. त्यात ३ खेळाडू भारतीय आहेत.

ज्या ५ खेळाडूंना या प्रकारात ७ द्विशतके केली आहेत त्यातील ३ द्विशतके एकट्या रोहितने केली आहेत. बाकी २३९८ खेळाडूंनी मिळून ४ द्विशतके केली आहेत.

वनडेत द्विशतके करणारे खेळाडू
२६४- रोहित शर्मा
२३७- मार्टिन गप्टिल
२१९- विरेंद्र सेहवाग
२१५- ख्रिस गेल
२०९- रोहित शर्मा
२०८- रोहित शर्मा
२००- सचिन तेंडुलकर