श्रीलंकेविरुद्ध युवराज सिंगला वगळले

सध्या क्रिकेट खेळत असणाऱ्या खेळाडूंपैकी जगातील सर्वात जास्त एकदिवसीय सामने खेळलेल्या युवराज सिंगल श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी वगळण्यात आले आहे. काल भारतीय संघाची या मालिकेसाठी घोषणा झाली.

जगातील सध्याच्या घडीचा दुसरा सर्वात जास्त सामने खेळलेला खेळाडू एमएस धोनीवर मात्र निवड समितीने विश्वास कायम ठेवत श्रीलंका दौऱ्यासाठी त्याची निवड केली आहे.

युवराज सिंगची भारतीय संघात निवड न होण्यामागील मुख्य कारण म्हणजे गेल्या ९ सामन्यातील त्याची कामगिरी. गेल्या ९ सामन्यात युवराजने ३९,१४, ४, २२, २३, ७, ५३ अशा खेळी केल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेत नुकत्याच झालेल्या तिरंगी मालिकेत भारत अ संघाला विजय मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावणाºया मनीष पांडेला मात्र भारतीय संघात स्थान देण्यात आले. या खेळाडूने तिरंगी मालिकेत जोरदार कामगिरी केली आहे.

भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा (उपकर्णधार), के.एल. राहुल, मनीष पांडे, अजिंक्य रहाणे, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी (यष्टिरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार व शार्दुल ठाकूर.

संपूर्ण वेळापत्रक:
एकदिवसीय मालिका
पहिला वनडे : २० आॅगस्ट (डॅम्बुला)
दुसरा वनडे : २४ आॅगस्ट (कॅण्डी)
तिसरा वनडे : २७ आॅगस्ट (कॅण्डी)
चौथा वनडे : ३१ आॅगस्ट (कोलंबो)
पाचवा वनडे : ३ सप्टेंबर : (कोलंबो)

एकमेव टी-२० सामना
६ सप्टेंबर (कोलंबो)