विराट-अनुष्काचे लग्न अखेर अफवाच ठरली ?

दिल्ली ।आज भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाची मोठी बातमी आली. हे दोघे ११ ते १३ डिसेंबर या काळात इटली येथे लग्नाच्या बेडीत अडकणार असे वृत्तही आले होते.

परंतु अनुष्काच्या मॅनेजरने मात्र हे वृत्त चुकीचे असल्याचे सांगितले आहे. ही अफवा असलयाचे तिने पीटीआयला सांगितले आहे. सुत्रांच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले होते परंतु अनुष्काच्या मॅनेजरने पुढे येऊन याचे खंडन केले आहे.