वाचा: भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेमुळे बदलणार आयसीसी क्रमवारीतील समीकरणे !

भारत आणि ऑस्ट्रेलिया १७ तारखेपासून सुरु होणाऱ्या मालिकेतील ५ एकदिवसीय आणि ३ टी -२० सामने खेळणारा आहेत. जो संघ हि मालिका ४-१ ने जिंकेल तो संघ आयसीसीच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर जाणार आहे.

आता आयसीसी क्रमवारीत भारत तिसऱ्या क्रमांकावर तर ऑस्ट्रेलिया ११७ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिका ११९ गुणांसह आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान आहेत. या मालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलिया दोंन्ही संघाना १२० पेक्षा अधिक गुण कमवून क्रमवारीत पहिले स्थान मिळवण्याची संधी आहे.

अशी असणार या मालिकेतील आयसीसी क्रमवारीसाठीची समीकरणे:

भारताने ऑस्ट्रेलियाला ५-० ने मात दिली तर भारत १२२ ऑस्ट्रेलिया ११३
भारताने ऑस्ट्रेलियाला ४-१ ने मात दिली तर भारत १२० ऑस्ट्रेलिया ११४
भारताने ऑस्ट्रेलियाला ३-२ ने मात दिली तर भारत ११८ ऑस्ट्रेलिया ११६
ऑस्ट्रेलियाने भारताला ३-२ ने मात दिली तर ऑस्ट्रेलिया ११८ भारत ११६
ऑस्ट्रेलियाने भारताला ४-१ ने मात दिली तर ऑस्ट्रेलिया १२० भारत ११४
ऑस्ट्रेलियाने भारताला ५-० ने मात दिली तर ऑस्ट्रेलिया १२२ भारत ११२

पाच सामन्यांची वनडे मालिका १७ सप्टेंबरला चेन्नईत सुरु होणार आहे, तर दुसरा एकदिवसीय सामना कोलकाता येथे २१ सप्टेंबरला होणार आहे. त्यानंतर २४ सप्टेंबर रोजी तिसरा एकदिवसीय सामना इंदोर येथे खेळला जाणार आहे. चौथा आणि पाचवा वनडे २८ आणि ०१ सप्टेंबरला अनुक्रमे बंगळुरू आणि नागपूर येथे खेळण्यात येणार आहे .