२०१९ विश्वचषकासाठी कोणत्याही खेळाडूच्या जागेबद्दल नाही खात्री!

आयसीसी वन-डे विश्वचषक स्पर्धा 30 मे 2019पासून इंग्लंड आणि वेल्स येथे खेळली जाणार आहे. यासाठी भारतीय संघातील कोणत्याचे खेळाडूचे नाव निश्चित झाले नाही असे भारतील वन-डे संघाचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात 3 वन-डे सामन्यांची मालिका होणार आहे. यातील पहिला सामना सिडनी येथे 12 जानेवारीला खेळला जाणार आहे. यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत रोहित बोलत होता.

“सध्यातरी विश्वचषकासाठी कोणाचेही नाव स्पष्ट करण्यात आले नाही. सध्या खेळत असलेला संघ कायम असला तरी त्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे”, असे रोहित म्हणाला.

“आता जे खेळाडू संघात आहेत ते विश्वचषकाच्या दृष्टीने चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहे. फिटनेस आणि कामगिरीत सातत्य कायम ठेवण्याचा भर खेळाडूंवरच आहे”, असेही रोहित म्हणाला.

यावेळी त्याने एसएम धोनीच्या फॉर्मबद्दल बोलताना त्याच्या संघात परत येण्याने संघामध्ये एकप्रकारची शांततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

“आतापर्यंत आपण धोनीला मैदानावर आणि ड्रेसिंग रूममध्ये बघत आलो आहोत. त्याचे संघात असल्याने कर्णधारालाही मदत होते”, असे रोहित पुढे म्हणाला.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वन-डे मालिकेतील दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे 15 जानेवारीला अॅडलेड आणि 18 जानेवारीला मेलबर्न येथे होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘कॉफी विथ करन’ शो हार्दिक पंड्या, केएल राहुलला भोवला, बीसीसीआय देणार ही मोठी शिक्षा!

संपुर्ण वेळापत्रक: असा असेल फेब्रुवारी-मार्चमध्ये होणारा ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा

अमिरीती विरुद्ध भारताला दक्ष राहण्याची गरज