विराट फक्त कसोटीच नाही तर दोन टी२० सामनेही खेळणार नाही!

मुंबई । आयपीएल संपल्यावर भारतीय संघ अफगाणिस्तानबरोबर एक कसोटी सामना खेळून इंग्लड दौऱ्यावर जाणार आहे. त्यासाठी भारतीय संघाची घोषणा ८ मे रोजी होणार आहे.

भारतीय संघ बेंगलोरला १४ ते १८ जून रोजी बेंगलोर येथे कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यातून अफगाणिस्तान कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला सरे या इंग्लडमधील काऊंटी संघाने जुन महिन्यासाठी करारबद्ध केले.

गेल्या इंग्लंड दौऱ्यात अपयश आल्यामुळे हा खेळाडू सध्या काऊंटी खेळण्याला प्राधान्य देणार आहे. ज्याचा उपयोग त्याला निश्चित आगामी दौऱ्यात होणार आहे.

कोहलीच्या सरेकडून खेळण्याची जोरदार चर्चा सध्या भारतात होत आहे. भारताचा एवढा मोठा स्टार आणि व्यस्त खेळाडू काऊंटी खेळत असल्यामुळे भारताप्रमाणेच याची इंग्लंडसह क्रिकेट विश्वात मोठी चर्चा आहे.

संपुर्ण जुन महिना हा खेळाडू सरेकडून खेळणार असल्याची घोषणा झाल्यामुळे या काळात जे आंतरराष्ट्रीय सामने होणार आहेत त्यातही हा खेळाडू भाग घेणार नाही.

सरे ९-१२ जुन या काळात हॅपशायर, २०-२३ जुन सोमरसेट तर २५-२८ जुन याॅर्कशायरसोबत सामने खेळणार आहे.

विराट जेव्हा सरेसोबतचा त्याचा या मोसमातील शेवटचा सामना खेळत असणार आहे तेव्हा भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर २ टी२० सामने खेळणार आहे.

या दौऱ्यात पहिला सामना २७ जून तर दुसरा सामना २९ जून रोजी होणार आहे त्यामुळे तो या दोन सामन्यालाही मुकणार आहे.

काऊंटी क्रिकेट खेळणार असल्यामुळे भारतीय संघाचा हा स्टार कर्णधार प्रथमच एक कसोटी आणि दोन टी२० सामन्यांना मुकणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –