शतक केलं विराटने, पण चर्चा होतेय धोनीची!

डर्बन । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या वनडे सामन्यात कर्णधार कोहलीने शतकी खेळी तर मुंबईकर अजिंक्य रहाणेने ७९ धावांची खेळी करत भारताला मोठा विजय मिळवून दिला.

या सामन्यात कर्णधार कोहलीला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. त्याचे हे वनडेतील ३३वे शतक होते. परंतु या सामन्यात माजी कर्णधार आणि सध्याचा यष्टीरक्षक कॅप्टन कूल धोनीची मोठी चर्चा झाली.

या सामन्यात धोनी यष्टीमागे सतत क्षेत्ररक्षण लावताना आणि गोलंदाजांना समजावताना दिसत होता. ट्विटरवर धोनी माइक असा काही काळ ट्रेंड झाला होता.

त्यानंतर फलांजीच्या वेळी जेव्हा ४ बाद २६४ अशी भारताची सुस्थिती असताना धोनी मैदानात आला आणि ३ चेंडू खेळत शेवटच्या चेंडूवर चौकार मारला. हीच सामन्यातील भारताची विजयी धाव ठरली.

धावांचा पाठलाग करताना धोनी तब्बल ४४वेळा नाबाद राहिला आहे दुसऱ्या स्थानावरील जाँटी -होड्स हा ३३वेळा नाबाद राहिला आहे. धोनीच्या याच गोष्टीमुळे त्याचे काल सोशल माध्यमांवर पुन्हा एकदा जोरदार कौतुक झाले.

विजयी धाव आणि धोनी हे नाते खास असल्याचे मतही धोणीप्रेमींनी व्यक्त केले.