न्यूझीलंड विरुद्ध अर्धशतकी खेळी केलेल्या जडेजाने भारतीय फलंदाजीबद्दल केले मोठे वक्तव्य

शनिवारी(25 मे) भारताचा विश्वचषक 2019 मधील पहिला सराव सामना न्यूझीलंड विरुद्ध द ओव्हल मैदानावर पार पडला. या सामन्यात भारताला न्यूझीलंडने 6 विकेट्सने पराभूत केले. भारताने या सामन्यात न्यूझीलंडला विजयासाठी 50 षटकात 180 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान न्यूझीलंडने 37.1 षटकात सहज पार केले.

या सामन्यात भारताची फलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरली होती. परंतू अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाने अर्धशतकी खेळी करत भारताला 179 ही समाधानकारक धावसंख्या गाठून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

त्याने या सामन्यात 50 चेंडूत 54 धावांची खेळी केली. तसेच त्याने 9 व्या विकेटसाठी कुलदीप यादव बरोबर 62 धावांची भागीदारीही केली. मात्र अन्य भारतीय फलंदाजांना या सामन्यात खास काही करत नाही.

पण भारतीय फलंदाजीबद्दल जास्त चिंता वाटत नसल्याचे जडेजाने सामन्यानंतर म्हटले आहे. तो म्हणाला, ‘हा आमचा पहिला सामना होता. आम्ही फक्त एक सामना खेळलो आहे आणि आपण एका वाईट डावामुळे आणि एका वाईट सामन्यामुळे खेळाडूंबद्दल निष्कर्ष काढू नये. त्यामुळे फलंदाजीच्या फळीबद्दल काळजी करण्याची गरज नाही.’

‘जेव्हा तूम्ही भारतातून इंग्लंडला येता तेव्हा नेहमीच कठिण जाते. भारतात सपाट खेळपट्टी असतात. आम्हाला अजून काम करण्यासाठी वेळ आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. फक्त चांगले क्रिकेट खेळत राहिले पाहिजे.

‘फलंदाजी फळी म्हणून आम्ही आमच्या फलंदाजीच्या शैलीवर मेहनत घेत आहोत. सर्वांना चांगला अनुभव आहे. काळजीचे कारण नाही.’

तसेच खेळपट्टीबद्दल जडेजा म्हणाला, ‘ही सामन्य इंग्लिंग परिस्थिती होती. खेळपट्टी सुरुवातीला नरम होती पण नंतर ती चांगली होत गेली. आम्हाला आशा आहे की एवढे गवत आम्हाला मिळणार नाही आणि विश्वचषकात फलंदाजीसाठी चांगली खेळपट्टी असेल.

त्याचबरोबर त्याला भारताने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्याबद्दल म्हणाला, ‘आम्हाला माहित होते की परिस्थिती वेगवान गोलंदाजीसाठी चांगली आहे. त्यामुळे आम्ही अशा कठिण परिस्थितीत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कारण जर आम्ही अशा परिस्थितीत फलंदाजी केली तर मुख्य स्पर्धेत फलंदाजांसाठी सोपी होईल. आम्ही हे आव्हान म्हणून स्विकारले. आम्ही नक्की चांगली कामगिरी करु. यात शंका नाही.’

पुढे जडेजा त्याच्या फलंदाजीबद्दल म्हणाला, ‘जिथेही मी खेळतो. मी पुढेही जे करतो ते करत राहिल. मी माझ्यावर विश्वचषकाचा विचार करुन दबाव टाकत नाही. मी गोष्टी साध्या ठेवायचा प्रयत्न करेल.’

‘माझ्याकडे फलंदाजी करताना बराच वेळ होता. खूप षटके बाकी होती. त्यामुळे मी माझ्या स्वत:शी संवाद साधत होतो की मला चूकीचे शॉट मारायचे नाही. मी घाई केली नाही. मला माहित होते जर मी सुरुवातीचे षटके खेळून काढली तर मला पुढे मदत होईल आणि तसेच झाले.’

‘मी माझ्या फलंदाजीवर आयपीएलदरम्यान काम केले आहे. जेव्हाही मला संधी मिळाली तेव्हा मी नेटमध्ये जाऊन माझ्या तंत्रावर आणि फटक्याच्या निवडीवर काम केले.’

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विश्वचषकामध्ये बांगालादेश हिरव्या जर्सीबरोबरच या नवीन जर्सीतही दिसणार खेळताना

पहिल्या सराव सामन्यात यष्टीरक्षक नाही तर क्षेत्रकक्षक झाला धोनी, पहा व्हिडिओ

प्रेक्षकांनी उडवलेल्या खिल्लीबद्दल शतकवीर स्टिव्ह स्मिथ म्हणाला…