नोवाक जोकोविचचा शांघाय मास्टर्सच्या अंतिम फेरीत प्रवेश

शांघाय मास्टर्सच्या उपांत्य फेरीत नोवाक जोकोविचने अलेक्झांडर झ्वेरेवला 6-2, 6-1 असे पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याचा हा या वर्षातील 44वा विजय ठरला आहे.

जोकोविच आणि झ्वेरेव हे दोघे दुसऱ्यांदाच आमने-सामने आले असून दोघांच्याही खात्यात एक-एक विजय आहे. झ्वेरेवने मागच्या वर्षी झालेल्या इटली ओपनमध्ये अंतिम फेरीत जोकोविचला पराभूत केले होते.

आजच्या विजयाने जोकोविचने सलग 16 सामन्यांत विजय मिळवला आहे. तसेच जुलैमध्ये दुखापतीनंतर परतताना त्याने विम्बल्डमध्ये  खेळल्यावर 26 सामन्यात विजय तर एका सामन्यात पराभव स्विकारावा लागला होता.

या आठवड्यात दोन्हीही टेनिसपटूंनी एकही सेट न गमावता उत्तम खेळ केला होता. मात्र आजच्या सामन्यात जोकोविचने बाजी मारली. यामुळे जर्मनच्या या 21 वर्षीय युवा टेनिसपटूला पहिला ग्रॅंड स्लॅम जिंकण्याची अजून वाट पहावी लागणार आहे.

पहिल्या सेटमध्ये 4-2 असे आघाडीवर असताना जोोकविचने ब्रेक पॉइंट मिळवत सेट 6-2 असा आपल्या नावे केला.

दुसऱ्या सेटमध्ये जोकोविचने झ्वेरेववर दबाब कायम ठेवत अप्रतिम सुरूवात केली. यावेळी 3-1 असा मागे असल्याने चिडलेल्या झ्वेरेवने रागाने रॅकेट फेकली. म्हणून त्याला आचारसंहिता भंग केल्याने दंड झाला.

जोकोविचने त्याचा विजयाचा धडाका कायम ठेवत या सामन्यात झ्वेरेवला एका तासांतच पराभूत केले.

तसेच जोकोविचने यावर्षी विम्बल्डन बरोबरच सिनसिनाटी मास्टर्स आणि युएस ओपनचे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम फेरीत त्याचा सामना अग्र मानांकित आणि गतविजेता रॉजर फेडरर किंवा क्रोएशियाच्या बोर्ना कोरिच विरुद्ध होऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या:

या कारणामुळे एमएस धोनी मुकणार या मोठ्या स्पर्धेला

पी कश्यपचा पासपोर्ट गहाळ; भारतीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची मागितली मदत

असा पराक्रम करणारा रिषभ पंत धोनी नंतरचा दुसराच भारतीय यष्टीरक्षक