नोवाक जोकोविच तिसऱ्यांदा युएस ओपनचा विजेता

न्युयॉर्क। युएस ओपन पुरुषांच्या अंतिम सामन्यात नोवाक जोकोविचने मार्टीन जुआन डेल पोट्रोला 6-3, 7-6 (7-4), 6-3 असे पराभूत केले.

तसेच जोकोविचने तिसऱ्यांदा युएस ओपनचे विजेतेपद पटकावत अमेरिकेचा दिग्गज टेनिसपटू पीट सॅम्प्रसच्या सर्वकालिन 14 ग्रॅंड स्लॅमची बरोबरी केली आहे. याच बरोबर सर्वकालिन ग्रॅंड स्लॅम विजेतेपद मिळवण्यामध्ये रॉजर फेडरर (20) पहिल्या आणि राफेल नदाल (17) दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

सध्या खेळत असलेल्या टेनिसपटूमध्ये तिसऱ्यांदा युएस ओपनचे विजेतेपद पटकावणारा जोकोविच सातवा खेळाडू आहे. त्याने 2011 आणि 2015चे विजेतेपद जिंकले आहे.

31 वर्षीय, जोकोविच 2016मध्ये फ्रेंच ओपन जिंकल्यानंतर सुमारे दोन वर्षे टेनिसपासून दूर होता. यावर्षी पुनरागमन करताना त्याने युएस ओपन बरोबरच विम्बल्डन आणि सिनसिनाटी ओपनचे विजेतेपद जिंकले आहे.

आर्थर अॅशे स्टेडियमवर झालेला हा सामना 3 तास 16 मिनिटे चालला. डेल पोट्रोचा फोरहॅंड शॉट हे त्याचे हत्यार आहे. त्याने या सामन्यात जोकोविचला पहिल्या दोन सेटमध्ये चांगलेच झुंजवले होते. काही वेळा तो आघाडीवरही होता. पण जोकोविचने त्याचा नैसर्गिक खेळ करत ते दोन कठीण सेट जिंकले. तर तिसरा सेट जोकोविचने सहज जिंकत सामना पण आपल्या नावे केला.

या सामन्यात डेल पोट्रोने 47 तर जोकोविचने 38 अनफोर्स्ड एरर केले. 2009चा युएस ओपनचा विजेता डेल पोट्रो एटीपी क्रमवारीत चौथ्या तर जोकोविच तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच राफेल नदाल पहिल्या तर रॉजर फेडरर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

Video: धाव घेताना केएल राहुलचा निघाला शुज; बेन स्टोक्सने केली मदत

पदार्पणातच अर्धशतक करणारा हनुमा विहारी द्रविड, गांगुलीच्या यादीत सामील