जोकोविच फ्रेंच ओपन मधून बाहेर

गतविजेत्या नोवाक जोकोविचला फ्रेंच ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. डॉमिनिक थीम्सने सरळ सेटमध्ये जोकोविचचा पराभव करत गेल्यावर्षीच्या याच स्पर्धेतील उपांत्यफेरीतील पराभवाचे उष्टे काढले.

सध्या खडतर काळातून जात असलेल्या जोकोविचला थीमने जोरदार धक्का देत हा सामना आपल्या नावावर केला. आता थीमची गाठ ९ वेळा फ्रेंच ओपन विजेत्या नदालशी उपांत्यफेरीत होईल.

फ्रेंच स्पर्धेत ६व मानांकन मिळालेल्या थीमने पहिल्या सेटमध्ये २ ब्रेक पॉईंट वाचवत तो सेट ७-६ (५) असा खिशात घातला. पुढच्या दोनही सेटमध्ये त्याने जोकोविचला डोके वर काढू दिले नाही. दुसरा सेट ६-३ तर तिसरा ६-० असा त्याने जिंकला.

जोकोविच करिअर ग्रँडस्लॅम पूर्ण केलेला केवळ आठवा खेळाडू गेल्या वर्षी याच स्पर्धेतील विजेतेपद जिंकून बनला होता.

थीमने एटीपी टूर स्थरावरील २५० सामने खेळले असून त्यात त्याने १५६ विजय तर ९४ पराभव पहिले आहेत.

ऑस्ट्रेलियन बांधव थॉमस मस्टरच्या विक्रमाची त्याला बरोबरी करायची संधी आहे. थॉमस मस्टरने १९९५ साली या स्पर्धेचं विजेतेपद जिंकलं होत.

ह्या वर्षी खेळलेल्या स्पर्धात ३४-१२ असून ते नदालच्या ४१-६ ह्या कामगिरीच्या खालोखाल आहे. त्यामुळे या दोन खेळाडूंमध्ये होणाऱ्या उपांत्यफेरीच्या सामन्यात मोठ्या प्रमाणावर चांगल्या खेळाची चाहते अपेक्षा बाळगून असणार आहेत.

२३ वर्षीय थीमने गेल्यावर्षीही फ्रेंच ओपनची उपांत्य फेरी गाठली होती. परंतु नोवाक जोकोविचकडूनच त्याचा पराभव झाला होता. थीमला ६-२, ६-१, ६-४ असे उपांत्यफेरीत पराभूत करत पुढे याच स्पर्धेचं विजेतेपद जिंकला होता.