विम्बल्डन: नोवाक जोकोवीच आज खेळणार पहिला सामना

सध्या खडतर फॉर्ममधून जात असणारा सर्बियाचा नोवाक जोकोविच आज विम्बल्डन २०१७ चा पहिला सामना खेळणार आहे. गेल्या १३ महिन्यात या खेळाडूला कोणतेही ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवता आलेले नाही.

२०१६ फ्रेंच ओपन विजेता असणारा जोकोविच त्यांनतर सतत आपल्या फॉर्मशी झगडत आहे. गेल्या वर्षी करिअर ग्रँडस्लॅम पूर्ण केलेला खेळाडू म्हणून विम्बल्डनमध्ये उतरलेल्या जोकोविचला विशेष चमक दाखवता आली नाही.

गेल्या ४ ग्रँडस्लॅम स्पर्धांपैकी जोकोविचला २ स्पर्धांत तिसऱ्या फेरीत गाशा गुंडाळावा लागलेला आहे. गेल्या आठवड्यात एस्टबॉऊर्न ओपनच विजेतेपद हे त्याने तब्बल जानेवारी महिन्यापासून मिळवलेलं पाहिलं विजेतेपद होत.

जोकोविचचा पहिल्या फेरीचा सामना स्लोव्हाकियाच्या मार्टिन क्लीझनशी भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी ६च्या पुढे सुरु होईल.