किंग कोहलीचा निर्धार पक्का, मालिका जिंकणारच

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत या संघामधील चार सामन्याच्या कसोटी मालिकेला 6 डिसेंबरपासून सुरूवात होत आहे. या मालिकेत सगळ्यांचेच लक्ष भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीवर असणार आहे. तो त्याच्या मैदानावरील आक्रमक स्वभावासाठी ओळखला जातो.

कोहली 2011-12 आणि 2014-15 या दरम्यानच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात होता. या दौऱ्यांमध्ये त्याने उत्तम कामगिरी करत 62 च्या सरासरीने 992 धावा केल्या होत्या. यामध्ये त्याच्या 5 शतकांचा समावेश आहे. तर चार शतके त्याने 2014-15 च्या दौऱ्यात केली होती.

2014-15च्या दौऱ्यात शेवटच्या कसोटी सामन्याने कोहलीने भारतीय संघाच्या पूर्णवेळ कसोटी कर्णधारपदाची जबाबदारीही घेतली होती. यावेळी त्याचे ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिशेल जॉन्सन सोबत काही शाब्दीक चकमकी झाल्या होत्या.

“मागील घटनांचा विचार करता मी माझ्यामध्ये फार बदल घडवून आणला आहे. मला ते दाखवून द्यायची गरज नाही. प्रतिस्पर्धी संघामध्ये मला पडायचे नसून पुढे जायचे आहे”, असे कोहली म्हणाला.

आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या भारताला आतापर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये एकही कसोटी मालिका जिंकता आली नाही. यामुळे ही मालिका भारतीय संघासाठी महत्त्वाची आहे.

‘सध्या माझे सर्व लक्ष संघाला विजय मिळवून देण्यात आहे”, असेही कोहली पुढे म्हणाला.

6 डिसेंबरपासून अॅडलेडवर खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीआधी भारताने सिडनीमध्ये आॅस्ट्रलिया एकादश संघाविरुद्ध चार दिवसीय सराव सामना खेळला आहे. यामध्ये कोहलीने पहिल्या डावात अर्धशतक केले. तसेच त्याने गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया एकादशच्या हॅरी निल्सनची विकेटही घेतली होती.

कोहलीने आत्तापर्यंत खेळलेल्या 73 कसोटी सामन्यात 54.57च्या सरासरीने 6331 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 24 शतकांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

२०१९च्या विश्वचषकासाठी धोनी संघात असायलाच पाहिजे…

तो खास पराक्रम करण्यासाठी बांगलादेशला खेळावे लागले तब्बल ११२ कसोटी सामन

दक्षिण आफ्रिकेच्या स्टेनगनचे ऑस्ट्रेलिया-भारत कसोटी मालिकेबद्दल मोठे वक्तव्य