या देशाच्या सर्वाधिक खेळाडूंनी खेळले आहेत ३००पेक्षा अधिक वनडे

पोर्ट ऑफ स्पेन। वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात दुसरा वनडे सामना रविवारी(11 ऑगस्ट) क्विन्स पार्क ओव्हल स्टेडीयमवर पार पडला. या सामन्यात डकवर्थ लूईस नियमानुसार वेस्ट इंडीजला 59 धावांनी पराभव स्विकारावा लागला. असे असले तरी वेस्ट इंडीजचा अनुभवी आक्रमक फलंदाज ख्रिस गेलसाठी हा सामना खास ठरला आहे.

गेलचा हा वनडे कारकिर्दीतील 300 वा सामना होता. त्यामुळे तो वनडे कारकिर्दीत 300 वनडे खेळणारा वेस्ट इंडीजचा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी कोणत्याही वेस्ट इंडीजच्या खेळाडूला 300 वनडे सामने खेळता आले नव्हते.

आत्तापर्यंत श्रीलंका, भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि आता वेस्ट इंडीज या संघांच्या एकूण मिळून 21 खेळाडूंनी 300 किंवा त्यापेक्षा अधिक वनडे सामने खेळले आहेत.

यामध्ये श्रीलंकेच्या सर्वाधिक खेळाडूंनी 300 किंवा त्यापेक्षा अधिक वनडे सामने खेळले आहेत. श्रीलंकेकडून एकूण 7 क्रिकेटपटूंनी असा कारनामा केला आहे. त्याच्या पाठोपाठ भारत असून भारताकडून 6 क्रिकेटपटूंनी 300 किंवा त्यापेक्षा अधिक वनडे सामने खेळले आहेत.

या संघाच्या सर्वाधिक खेळाडूंनी खेळले आहेत 300 किंवा त्यापेक्षा अधिक वनडे – 

7 – श्रीलंका

6 – भारत

3 – पाकिस्तान

2 – ऑस्ट्रेलिया

2 – दक्षिण आफ्रिका

1 – वेस्ट इंडीज

(न्यूझीलंड आणि इंग्लंडकडून आत्तापर्यंत एकाही खेळाडूने 300 पेक्षा अधिक वनडे सामने खेळले नाही)

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

…म्हणून विराट कोहलीसाठी हे शतक महत्त्वाचे होते

जेव्हा फलंदाज विराट कर्णधार विराटचे नाव इतिहासात लिहीतो

११ धावांवर बाद झाला ख्रिस गेल पण केला हा मोठा विश्वविक्रम