एनवायसीएस गेल इंडियन स्पीड स्टारच्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स सराव शिबिराला बालेवाडीत सुरुवात

गेल इंडिया आणि नॅशनल युवा कॉ ऑप सोसायटी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने एनवायसीएस गेल इंडियन स्पीड स्टार या मोहिमे अंतर्गत राष्ट्रीय अॅथलेटिक्स सराव शिबिराला दिनांक ५ ऑगस्ट रोजी पुण्यातील बालेवाडी येथे सुरुवात झाली.

गेली तीन वर्ष देशाच्या सर्व राज्यामध्ये १३० ठिकाणी घेण्यात आलेल्या धावपटू शोध मोहिमे अत्तर्गत ६०० पेक्षा अधिक जिह्यामध्ये साडे तीन लाख धावपटूंनी सहभाग नोंदवला होता.

जागतिक दर्जाचे धावपटू तयार करण्यासाठी विविध राज्यातील खेळाडूंची निवड चाचणी घेण्यात आली होती. त्यामधून २५ धावपटूंची निवड करण्यात आली . ह्या माध्यमातून निवड केलेल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्थरावर जमेका ह्या देशात जगविख्यात धावपटू उसैन बोल्ट ह्याच्या अकादमीमध्ये मध्ये प्रशिक्षण देण्यात आले.

ह्या माध्यमातून देशात जागतिक दर्जाचे धावपटू कसे तयार होतील ह्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. त्याच धर्तीवर बालेवाडी ह्या ठिकाणी होणाऱ्या सराव शिबिराला सुरवात झाली.

भारताच्या नावाजलेल्या धावपटू कविता राऊत आणि रचिता मिस्त्री ह्या दोघी बालेवाडी ह्या ठिकाणी महिनाभर होणाऱ्या शिबिराला प्रमुख मार्गदशक म्हणून काम पाहणार आहे.

त्याच्या अनुभवाचा फायदा ह्या नवीन धावपटूंना मिळण्यासाठी ह्या माध्यमातून नक्कीच मदत मिळणारं आहे. ह्या सराव शिबिरात देशातील वीस धावपटू सहभागी झाले असून महिनाभर हे सराव शिबीर चालणार आहे त्यामध्ये खेळाडूं पूर्णपणे कसून सराव ह्या शिबिरात करणार आहे.

राष्ट्रीय कमिटी मध्ये धावपटू पी.टी .उषा, श्रीराम सिंग शेखावत, रचिता मिस्त्री अनुराधा बिस्वाल, कविता राऊत, मनीष बहुगुणा आणि राज्यसभा खासदार व्ही. मुरलीधरन,एनवासीएस चेअरमन राजेश पांडे,प्रोजेक्ट प्रमुख हिरण्य मोहंती हे काम पाहत असून जास्तीत जास्त धावपटू निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे .

२०२२ मध्ये होणाऱ्या टोकियो ऑलिंपिक पर्यंत खेळाडूंचा सर्व खर्च ह्या माध्यमातून केला जाणार आहे . जेणे करून भारताचे नाव सुवर्ण पदकाच्या कमाईत पुढे असेल.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

अर्जून तेंडुलकर करतोय लॉर्ड्सच्या ग्राउंडस्टाफला मदत, चाहत्यांनी केले जोरदार कौतूक

जेम्स अॅंडरसनकडून कुंबळेच्या जंबो विक्रमाची बरोबरी

लॉर्ड्सवरील आॅनर्स बोर्डवर स्थान मिळवण्यासाठी एवढी मोठी कामगिरी करावी लागते