व्हिडिओ व्हायरल- सर्फराजला थंडी वाजणार नाही याची काळजी घेऊ

पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हकचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यात पाकिस्तान संघाचा निवड समिती प्रमुख इंझमाम खेळाडूंना दुखापतीपासुन सुरक्षित ठेवण्याचा अजब फाॅर्मुला सांगत आहे.

पाकिस्तान संघाची इंग्लंड दौऱ्यासाठी नुकतीच घोषणा झाली. यावेळी १५ ऐवजी १६ खेळाडूंचा संघ इंग्लंड दौऱ्यावर पाठवण्यात आला आहे. परंतु यामध्ये केवळ एकच यष्टिरक्षक निवडण्यात आला आहे, तो म्हणजे कर्णधार सर्फराज अहमद.

याबद्दल निवड समितीचे प्रमुख इंझमाम उल हक यांना पत्रकारांनी प्रश्न केला की आपण या दौऱ्यावर बॅकअप यष्टीरक्षक घेऊन जात नाही. त्यामुळे कर्णधारपद तसेच यष्टीरक्षणाची जबाबदारी सर्फराज येत आहे. तसेच तो जर थंडीमुळे अाजारी पडला किंवा तो सामन्यासाठी फिट राहिला नाही तर काय करायचं?

यावर कोणतेही तांत्रिक कारण न देता इंझमाम उल हक म्हणाला, सर्फराजला थंडी वाजणार नाही याची आम्ही काळजी घेऊ.

गेल्या ५ वर्षांत कोणताही संघ केवळ एक यष्टीरक्षक घेऊन इंग्लंड दौऱ्यावर गेला नाही. त्यामुळे इंझमाम उल हकच्या या निर्णयावर पाकिस्तानमध्ये जोरदार टीका होत आहे.

पाकिस्तान या दौऱ्यात दोन कसोटी सामने खेळणार असुन पहिला सामना २४ मे तर दुसरा सामना १ जुन रोजी होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –