भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदासाठी एका मेकॅनिकल इंजिनीअरचा अर्ज

बेरोजगारीमुळे नाही तर भारतीय कर्णधार विराट कोहलीला धडा शिकवण्यासाठी एका मेकॅनिकल इंजिनीअरने प्रशिक्षक पदासाठी अर्ज केला आहे. अनिल कुंबळेला कोहलीच्या रागीट आणि मुजोर स्वभावामुळेच प्रशिक्षक पदावरून पायउतार झाला आहे असं मानणाऱ्या लोकांपैकी हा इंजिनीअर आहे.

उपेन्द्रनाथ ब्रह्मचारी असं या अर्जदारचं नाव असून तो एका बांधकाम कंपनीशी निगडित आहे. त्याने अर्ज केलेला ई-मेल हा बीसीसीआयच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

त्याच्या अर्जामध्ये तो म्हणतो, ” कुंबळेने राजीनामा दिल्यावर मी या पदासाठी अर्ज करत आहे. कारण भारतीय कर्णधार विराट कोहलीला या पदासाठी कोणताही महान खेळाडू नको आहे. ”

“जर सचिन , गांगुली आणि लक्ष्मण यांच्या सल्लागार समितीने जर एखाद्या माजी खेळाडूला पुन्हा प्रशिक्षक केले तर कोहली त्यांचा पुन्हा अपमान करून कुंबळे सारखं त्यांना बाहेर काढेल. ”

” मी कर्णधारची मुजोरी सहन करू शकतो जे की महान माजी खेळाडू करू शकत नाही. मी कोहलीला योग्य मार्गावर आणू शकतो. त्यांनतर बीसीसीआय पुन्हा एखाद्या महान खेळाडूला या पदावर आणू शकते. ” असेही हा इंजिनीअर पुढे आपल्या अर्जात म्हणतो.